
महावार्ता न्यूज ः हिंदू नव्या वर्षी मुळशीतील अनेक गावात कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. पिरंगुट गावात तब्बल 7 वर्षांनंतर गावजत्रा होत असल्याने उत्साह शिगेला पोहचला आहे. संत गणोरेबाबांची स्थापन केलेल्या भूकूममधील हरिराम आश्रय मठात नवग्रह शांत होम करून नववर्षांचे स्वागत केले जाणार आहे. भूकूम गावातील स्वयंभू श्री रामेश्वर मंदिराच्या जिर्णाव्दारासाठी पायाभरणी पाडव्याच्या मुर्हूर्तावर होत आहे.
पिरंगुट येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ जोगेश्वरी उत्सवानिमित्त बुधवार (ता. २२) ते शुक्रवार (ता. २४) पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.यात्रेच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवाच्या निमित्ताने सकाळी ७ वाजता श्रींची महापूजा रात्री ६ वाजता पालखी, छबिना मिरवणूक व पान सुपारी आयोजित केली आहे. यावेळी गोळे आळी मंदिर ते पवळे आळी मंदिर अशी मिरवणूक होणार असून पानसुपारी पवळे आळी मंदिरात होईल. त्यानंतर रात्री ७.३० वाजता पवळे आळी मंदिर ते गोळे आळी मंदिर अशी मिरवणूक निघणार असून गोळे आळी मंदिरात पानसुपारीचे आयोजन केलेले आहे असून रात्री १० वाजता ढोल झांज पथक व पारंपरिक वाद्यांची स्पर्धा होणार आहे. त्यानंतर रात्री १२ वाजता भजनाचा कार्यक्रम होणार आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ९ ते १२ या कालावधीत विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम, दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंत कुस्त्यांचा आखाडा होणार भरविल्या आहेत. यात्रेच्या शेवट दिवशी सकाळी ८ वाजता बैलगाडा शर्यत राबविल्या आहेत.
मुळशीतील पावन तिर्थक्षेत्र असणार्या भुकूम मठात सालाबादप्रमाणे नवग्रह शांती होम गुढीपाडव्यानिमित्त होणार आहे. पहाटे 5 वाजता काकड आरती व संत गणोरेबाबा समाधी अभिषेक होईल. सकाळी 10.30 ते 1 नवग्रह शांती होत होतील. त्यानंतर राशीनुसार संकल्प सोडला जाईल. दुपारी 1 नंतर महाप्रसाद असेल. अशी महिती मठाचे विश्वस्त एकनाथ हगवणे व निनाद मुळे यांनी दिली आहे.
भूकूम गवात दुपारी 3 वाजता गुढीपाडव्या निमित्त स्वयंभू श्री रामेश्वर मंदिराचा पायाभरणी समारंभ होईल. शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज यांच्या हस्ते हा समारंभ होईल अशी माहिती मंदिर न्यासाचे अध्यक्ष विजय माझिरे यांनी दिली आहे.
Share