पुणे
Trending
घोटवडेतील भेगडे बंधूचे हॉटेल राजयोगच्या नव्या वास्तूचा गुढीपाडव्याला शुभारंभ, नव्या दिमाखात खवय्यांच्या भेटीसाठी हॉटेल सज्ज

महावार्ता न्यूज ः शिवेसेनेचे संघटक प्रकाश किसनराव भेगडे व त्याचे बंधू सचिन भेगडे यांच्या परिश्रमातून नावरूपाला आलेल्या हॉटेल राजयोगच्या नव्या वास्तूचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बुधवारी 22 मार्चला घोटावड्यात होत आहे.

हिंजवडी – घोटवडे रस्तावरील, हनुमान चौकजवळील हॉटेल राजयोग हे गेल्या 23 वर्षांपासून मुळशीच नव्हे तर पुणे जिल्हयाच्या खवय्यांचे ठिकाण बनले आहे. भोर विधानसभा मतदार संघातील शिवेसेनेचे संघटक प्रकाश किसनराव भेगडे यांनी नव्या शतकात 2000 साली हॉटेल राजयोगची मुर्हूतमेढ रोवली होती. गेल्या दशकापासून मटण-भाकरीसह व्हेज – नॉन व्हेज जेवणासाठी पंचक्रोशीत हॉटेल राजयोगचे नाव सर्वांच्या मुखी आहे. बापूजी बुवा खिंडीपलीकडील आय टी पार्कमधूनही युवा वर्ग राजयोगला पसंती देत आहेत.
वाढती प्रतिसादामुळे दुमजली हॉटेल राजयोग नव्या दिमाखात खवय्यांच्या भेटीसाठी हॉटेल सज्ज झाले आहे. याचा शुभारंभ 22 मार्चला सायं 6 वाजता होणार असल्याची माहिती शिवेसेनेचे संघटक प्रकाश किसनराव भेगडे यांनी दिली आहे.
Share