खेळ खेळाडूमाय मुळशी
Trending
जिगरबाज मुळशी सुवर्णकन्या कोमल गोळे ही लग्नानंतरही कुस्ती आखाड्यात, सांगलीत पहिली महाराष्ट्र केसरीसाठी झुंजणार

महावार्ता न्यूज : जागतिक कुस्ती स्पर्धेत सहभागी झालेली पहिली महाराष्ट्रीन महिला कुस्तीगीर कोमल गोळे ही आता सांगलीतील पहिली महाराष्ट्र केसरी किताब जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. मुळशीची सुवर्णकन्या असलेली कोमल लग्नानंतर पुन्हा कुस्ती आखाड्यात उतरली असून सांगलीतील स्पर्धेत ती पुणे संघाकडून झुंजणार आहे.
पहिली महिला महाराष्ट्र केसरी व 24 वी राज्य अजिंक्यपद महिला कुस्ती स्पर्ध सांगलीत सुरू झाली आहे. या स्पर्धेतील महाराष्ट्र केसरी किताबाच्या 65 ते 74 किलो वजनी गटात कोमल खेळणार आहे. कोल्हापुरात राम सारंग यांच्या राष्ट्रकुल कुस्ती संकुलात मेहनत घेऊन कोमलने कुस्तीत पुनरागमन केले आहे. लग्नानंतर काही काळ तिने विश्रांती घेतली होती, कुस्ती प्रशिक्षणाचा एनआयएस अभ्यासक्रम पूर्ण करून तीने वयाच्या 30 व्या वर्षी पुन्हा स्पर्धात्मक कुस्ती खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
2018 मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यांनंतर तिची 2019 मध्ये जागतिक महिला कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली होती. विजेतेपदासाठी तिला कोल्हापूर, पुणे, नगर, सांगलीतील मल्लांशी मुकाबला रंगणार आहे 24 मार्चला पहिली महिला महाराष्ट्र केसरीची मानाची गदा कोमल जिंकेल असा प्रशिक्षक राम सारंग यांना विश्वास आहे.
कोमल भगवान गोळे ही मूळची पिरंगुटची कुस्तीगीर आहे . तिला 2020 मध्ये पांडूरंग दुधाणे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या तुळजाभवानी पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
Share