
महावार्ता न्यूज: भारत सरकार आणि ब्रह्माकुमारीजच्या संयुक्त विद्यमाने मुळशीत रविवार 28 मे रोजी नशा मुक्त भारत अभियांच्या उदघाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुळशीतील दारवलीमधील धनवेवाडी येथील हृदयमोहिनी वन येथे होणार्या कार्यक्रमात राजयोग समुपदेशक डॉ. सचिन परब हे समुपदेशन करणार आहेत. याप्रसंगी आदित्य हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमरसिंह निकम व प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असेल. बीके नलिनी दीदी यांचेही मार्गदर्शन मिळणार आहे.
रविवार 28 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत होणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याचे वरिष्ठ राजयोग प्रशिक्षिका व पिंपरी चिंचवड विभाग संचालिका ब्रह्माकुमारी करुणा दीदी यांनी सांगितले.
Share