माय मुळशी
Trending
बारावीच्या परीक्षेचा मुळशी तालुक्याचा निकाल 96.09 टक्के, पौड विद्यालयात सुहास संजय हुलावळेचा प्रथम क्रमांक

पौड (ता.मुळशी) इयत्ता बारावीच्या परीक्षेत प्रथम आल्याबद्दल सुहास हुलावळे ,आदित्य राऊत यांचा सत्कार करताना प्राचार्य एस.व्ही.भोकरे
महावार्ता न्यूज ःमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा मुळशी तालुक्याचा निकाल 96.09 टक्के लागला आहे. उत्तीर्णांमध्ये मुलींनीच बाजी मारली. तथापि गतवेळच्या तुलनेत यावर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा मात्र घसरली. पौड आणि पिरंगुटच्या वाणिज्य, मारूंजी आणि पिरंगुट चाणाक्यच्या विज्ञान आणि सूर्यदत्ताच्या व्होकेशनल या पाचच विभागांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत.
तालुक्यात पौड, पिरंगुट, भूगाव, हिंजवडी, कासारआंबोली, ताथवडे, मारूंजी, भांबर्डे, उरवडे, बावधन, माण या अकरा ठिकाणी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेचे बारावीचे वर्ग आहेत. तर पौड, पिरंगुट, बावधनला व्यवसाय अभ्यासक्रमाचे विविध अभ्यासक्रम शिकविले जातात. या सर्व शाळांमधून 2662 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 2558 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांचे उत्तीर्णांचे प्रमाण 94.26 तर मुलींचे प्रमाण 96.64 टक्के आहे. पौड विद्यालयात वाणिज्य विभागाच्या सुहास संजय हुलावळे यांने 93.33 टक्के गुण मिळवून पहीला तर 89.83 टक्के गुण मिळवून आदित्य कल्पेश राऊत दुसरा आला. प्राचार्य एस.व्ही.भोकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी कोळवणचे मुख्याध्यापक एच.टी.चव्हाण, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सोनाली साळुंके विभाग प्रमुख प्रा.एस.डी.शेंडगे, आर.पी.सोनवणे, बंडू दातीर, राणी कोल्हे, मनिषा वाचकवडे आदि उपस्थित होते.
तालुक्यातील विविध शाळांचे निकाल पुढीलप्रमाणे – श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, पौड ( कला – 96.66, वाणिज्य 100, व्यवसाय विभाग – 96.82), पिरंगुट इंग्लिश स्कूल (कला – 91.26, वाणिज्य 100, विज्ञान – 98.19, व्यवसाय विभाग – 97.50), न्यू इंग्लिश स्कूल, हिंजवडी (कला – 90.62, वाणिज्य – 96.34), माध्यमिक विद्यालय, भूगाव (वाणिज्य – 95.91), राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळा, कासारआंबोली ( विज्ञान – 88.70), बालाजी ज्युनियर कॉलेज ताथवडे (विज्ञान – 99.02, वाणिज्य – 97.45), मारूंजी विद्यालय ( वाणिज्य – 97.90. विज्ञान- 100), संपर्क विद्यालय, भांबर्डे (वाणिज्य-55.55), सूर्यदत्ता महाविद्यालय, बावधन ( कला – 97.67, वाणिज्य – 94.36, विज्ञान 94.89, व्यवसाय विभाग – 100), अनुसया ओव्हाळ विद्यालय ( कला – 92.30, वाणिज्य – 90.90), माध्यमिक विद्यालय, उरवडे (वाणिज्य – 84.84), चैतन्य ज्युनियर कॉलेज, नांदे (विज्ञान – 99.28), चाणाक्य ज्य़ुनियर कॉलेज, पिरंगुट (विज्ञान – 100), अकेमी ज्युनियर कॉलेज (विज्ञान – 98.71, वाणिज्य – 97.26).
Share