गोकुळ संघर्ष मोर्चातून महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तनाची सुरुवात! – सतेज पाटील

स्वीकृत संचालक नियुक्ती म्हणजे हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांचे षड्यंत्र; आमदार सतेज पाटील यांचा घणाघाती आरोप
विराट मोर्चात बारा तालुक्यांतील शेतकरी, वीर पक्ष व विविध संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग
कोल्हापूर (राजेंद्र मकोटे) : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमधील सत्तासंघर्ष आता अधिक तीव्र झाला असून, या संघर्षातूनच महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तनाची सुरुवात होईल, असा आक्रमक राजकीय निर्धार आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. गोकुळमध्ये स्वीकृत संचालक नियुक्त करण्याचा निर्णय म्हणजे मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांचे राजकीय षड्यंत्र असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
गोकुळच्या कारभारातील राजकीय हस्तक्षेप, संचालक नियुक्तीचा मुद्दा आणि दूध उत्पादकांच्या प्रश्नांवरून काढण्यात आलेल्या विराट संघर्ष मोर्चामध्ये जिल्ह्यातील बारा तालुक्यांतील शेतकरी, वीर पक्षाचे कार्यकर्ते तसेच विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मोर्चातील उत्स्फूर्त उपस्थितीमुळे विरोधकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ऐतिहासिक दसरा चौकातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाहीर सभेत परावर्तित झाला .
गोकुळ ही केवळ दूध उत्पादकांची सहकारी संस्था नसून जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे संस्थेच्या निर्णय प्रक्रियेत दूध उत्पादकांचे हित आणि लोकशाही मूल्ये जपली गेली पाहिजेत, अशी भूमिका मोर्चातून मांडण्यात आली.

आपण औषधे घेऊन गोकुळ साठी प्रचार केला आमच्या उमेदवारांना विजयी करण्याची अग्रणी विनंती सभासदाना केली तर आपण जातीवादी कसे झालो आपण मुलग्या साठी नव्हे तर सामान्य कार्यकर्त्यांच्या विजयासाठी संघर्ष करत होतो आणि त्याला स्वाभिमानी मतदारांनी साथ दिली आहे इतके वर्षे राजकारणात असतानाही फक्त आपल्यामुळेच आपण गोकुळ मध्ये प्रवेश करू शकला हे मुश्रीफ यांनी कधीही विसरू नये फक्त आपला मुलगा निवडणुकीत पडला असा असे का सांगत फिरता मातंग समाजाचा डॉक्टर सुजित मिणचेकर पडला मराठा समाजाच्या उमेदवार पडला हे का सांगत नाही असा सवाल ही सतेज पाटील यांनी नमूद केले

सत्ता केंद्र आपल्या सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी गोकुळमध्ये चार सदस्य नेमले 500 कोटीची अट ठेवली मात्र भविष्यात ही अट एक कोटी येऊन ग्रामपंचायत आणि अगदी आपल्या हाऊसिंग सोसायट्या पर्यंत सुद्धा हे लोन पोचेल हे वेळीच रोखण्यासाठी कोल्हापूरकर सज्ज झाले असून त्याच महाराष्ट्रातून मिळत असलेला पाठिंबा हे उद्याच्या सत्ता परिवर्तनाची नांदीच आहे असेही अग्रणी त्यांनी नमूद केले .

गोकुळ सरदार पटेल मिल्क फेडरेशन च्या मध्ये विलीन करून भारतामध्ये फक्त अमोल आणि मदर डेरी असे दोनच ब्रँड ठेवण्याचे क्षणयंत्र रचले जात आहेत मात्र त्यास निर्णय विरोध होणार असल्याचे या विराम मोर्चा सिद्ध होत आहे असे सांगत त सतेज पाटील यांनी उद्याच्या चेअरमन निवडणुकी च्या सभेमध्ये चार स्वीकृत सदस्यांना पाठवू नका आणि लोकशाहीची बूज राखा असे आवाहन केले संभाव्य नियोजित चार सदस्यांपैकी एक थेट कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेरील अँड.प्रशांत पाटोळे सांगली मधील आहेत कोल्हापूरमध्ये लायक पदाधिकाऱ्यांची वनवा आहे का असाही सवाल त्यांनी केला जिल्ह्याबाहेर सदस्य गोकुळ मध्ये नेमणे हे विलीनीकरणाची सुरुवात होऊ शकते हा धोका सर्वांनीच वेळीच ओळखावा असेही सूचकपणे सतीश पाटील यांनी नमूद केले
आगामी 20 29 च्या निवडणुकीत सत्ता परिवर्तनाची सुरुवात हे आजच्या गोकुळच्या संघर्ष विराट मोर्चातून झाली आहे आणि महाराष्ट्रातील राजकारणाला हा मोर्चा दिशादर्शक ठरेल लढलो तर जिंकू शकतो हा विश्वास या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्याने अवघ्या महाराष्ट्रात दिला आहे असे घनगलाती प्रतिपादन करत सतीश पाटील यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला

 

See also  महाराष्ट्राच्या महिलाशक्तीचा सुवर्ण पराक्रम, अकुताई,भाग्यश्री, प्रतिमा सलग दुसर्‍यांदा पदकवीर
अध्यक्ष भाषणात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आजचा विराट मोर्चा ही सामान्य नागरिक आणि जनतेला एक संघर्षासाठी बळ देणारा ठरला आहे असे नमूद केले या मोर्चात मंत्री जयंत पाटील माजी मंत्री जयंत तासगावकर सांगलीचे कदम यांच्यासह विविध सामाजिक सहकारी सांस्कृतिक क्षेत्रातील पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते ऐतिहासिक दसरा चौकातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट सभेत रूपांतरित होऊन समाप्त झाला .
या मोर्चाने गेली आठवड्यावर कोल्हापुरात जणू निवडणूक सदृश्यच वातावरण दिसून येत होते . मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय स्वरूपात होती . भेट म्हशी जनावरांसह शेतकऱ्यांचा सहभाग आसूड वाजवणारे कार्यकर्ते आणि 16 फुटी कोल्हापुरी पायतान अशा विविध कल्पक सहभागाने हा मोर्चा अधिकच लक्षवेधी ठरला .