युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी सौरभ अमराळे यांची निवड, पुण्यात काॅग्रेसचे ताकद दिसणार- अमराळे

 महावार्ता न्यूज : पुणे शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी सौरभ अमराळे यांची निवड करण्यात आली आहे. मुळशीकर उद्योगरत्न बाळासाहेब अमराळे यांचे ते पुत्र आहेत. 
इंडीयन युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी महाराष्ट्र युथ काँग्रेसच्या काही पदांसह विविध जिल्ह्यातील नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.त्यात पुणे शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सौरभ अमराळे यांच्यावर सोपवली आहे. आता पुण्यात काॅग्रेस पक्षाची ताकद दिसण्यासाठी कार्यरत रहाण्याचा संकल्प अमराळे यांनी केला आहे. 
सौरभ अमराळे यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून गेले १५ वर्षे कार्यकर्ता, उपाध्यक्ष ,वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणूनही भरीव कामगिरी केली आहे.तसेच ते विविध संघटनांचे पदाधिकारी असून सामाजिक कार्यातही सदैव अग्रेसर असतात.विशेषतः संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांचा हातखंडा असल्याचे पाहून त्यांच्यावर आता पुणे शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. 
See also  संग्राम थोपटे यांच्या प्रचारार्थ मुळशीत संजय राऊतांची तोफ धडाडणार, महाविकास आघाडीच्या एकाच दिवशी दोन दिग्गजांच्या सभांनी भोर मतदार संघ दणाणून जाणार