कुस्ती मल्लविद्या महासंघ जिल्हाध्यक्षपदी पै दिलीप भरणे यांची निवड, कुस्तीला गतवैभव मिळवून देणार – पै  भरणे

महावार्ता न्यूज: महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी “महान महाराष्ट्र केसरी” माण गावचे सुपुत्र पै दिलीप भरणे यांची एकमताने निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या असोसिएशन संलग्न पुणे जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाचा नुतन पदाधिकारी स्वागत व निवडपत्र प्रदान सोहळा हिंजवडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आयटीपार्कच्या ग्रँड तमन्ना हॉटेल्सच्या सभागृहात झालेल्या या बैठक पुणे शहराध्यक्ष पदी पै.हेमंत माझिरे यांची तर पिंपरी चिंचवड च्या शहर अध्यक्ष पै.योगेश काकडे नियुक्ती करण्यात आली.
या समारंभास अर्जुनवीर पुरस्कार विजेते प्रशिक्षक वस्ताद काका पवार , वस्ताद श्रीकृष्ण बराटे, स्वस्तिक चोंधे, संतोष गरुड,आंतरराष्ट्रीय पंच शिवाजी तांगडे, संतोष दसवडकर,भरत लिम्हण,राहुल जाधव, किशोर नखाते यांच्यासह जुने नामवंत पैलवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप्रज्वलन व महाबली हनुमंताच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.या बैठकीत अनेक मान्यवर कुस्तीगीरानी पूर्वीची कुस्ती व सद्यस्थिवर आपापली मते सडेतोडपणे मांडली. लाल मातीशी बेईमानी करणाऱ्यां कुस्तीतील काही पैलवानांवर सडकून टीका करण्यात आली. तर अनेकांनी डोपिंग टेस्ट, होणाऱ्या नुरा कुस्त्या तसेच कुस्ती क्षेत्रांत आलेल्या राजकारणावर सडकून टीका केली . आगामी काळात राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत उत्तेजक द्रव्य सेवन करणाऱ्यांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी कोल्हापूर,सातारा, सोलापूर ,सांगली, पुणे जिल्ह्यातील कुस्ती मल्लविद्या महासघाचे पदाधिकारी
मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कुस्ती निवेदक युवराज केचे यांनी केले.संयोजन गणेश परदेशी, प्रल्हाद ओझरकर ,नवनाथ ओझरकर, यांनी केले. पै.गणेश मानुगडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कुस्ती क्षेत्रात सद्या चाललेल्या गोष्टी व आलेले राजकारण कुस्तीला काळिमा फासणाऱ्या आहेत. दोन दोन महाराष्ट्र केसरी होणे किंवा तशा स्पर्धा होणे म्हणजे कुस्तीची व त्या पदकाची किंमत कमी करणे आहे. या गोष्टी पटत नसल्याने अनेक खरे पैलवान या राजकारणापासून लांब गेले आहेत. परंतु कुस्तीला पुन्हा गतवैभव प्राप्त करण्यासाठी मल्लविद्या महासंघाचे वतीने आम्ही प्रयत्न करणार असल्याचे पै. दिलीप भरणे,   महान महाराष्ट्र केसरी यांनी सांगितले. 
यावेळी निवड झालेले पुणे जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघ पदाधिकारी पुढीलप्रमाणे..
1) अध्यक्ष – पै.दिलीप भरणे
2) उपाध्यक्ष – ऋतुराज काळे
3) सरचिटणीस – संतोष दसवडकर
4) खजिनदार – अर्जुन सुर्यवंशी
5) तांत्रिक समिती अध्यक्ष – बापु भागवत
6) कार्यकारणी सदस्य – सतिश बावकर
7) कार्यकारणी सदस्य – सागर काळे
पुणे शहर कुस्ती मल्लविद्या महासंघ पदाधिकारी
1) अध्यक्ष – हेमंत माझिरे
2) उपाध्यक्ष – वैभव दिघे
3) सरचिटणीस – विशाल गायकवाड
4) खजिनदार – श्याम शिंदे
5) तांत्रिक समिती सदस्य – निकुंज उभे
6) कार्यकारणी सदस्य – गिरीश काशीद
7) कार्यकारणी सदस्य – रोहित माकर
See also  हिंजवडीतून बगाडासाठी शेले आणण्यासाठी हजारों भाविकांचे प्रस्थान, चांगभलंच्या जयघोषाने दुमदुमली आयटीनगरी