तायक्वांदो स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

महावार्ता न्यूज: गोवा येथे झालेल्या खुल्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत पुण्यातील आर. बी. होरांगी अकॅडमी आणि सेंट फेलिक्स स्कुलच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. क्योरूगी आणि पुमसे प्रकारात खेळाडूंनी प्रतिभेचे दर्शन घडवत नऊ सुवर्ण, चार रौप्य व १४ कांस्यपदकाची कमाई केली. तसेच सांघिक विजेतेपदही मिळवले. तायक्वांदो स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी केवळ तांत्रिक क्षमताच नाही, तर खेळाप्रती त्यांची अतूट बांधिलकीही दाखवली. त्यामुळे ही स्पर्धा पाहण्यासाठी जगभरातून प्रेक्षकांनी हजेरी लावली.

उमैमाह सुफियान अन्सारी (पुमसे-रौप्य), स्तुती विशाल पटारे (पुमसे-कांस्य), सानिधी मिलिंद खांदोडे (पुमसे-कांस्य), हानिका गिरीश पाटील (पुमसे-सुवर्ण), निहारिका दीपक इंदिश (पुमसे-सुवर्ण), जोआना जोशुआ काकडे (पुमसे-कांस्य), दियारा बिजॉय नायर (पुमसे-कांस्य), व्हायोलिना दास (पुमसे-सुवर्ण, क्योरुगी-रौप्य), स्मेरा मोहन लोंढे (पुमसे-रौप्य), मिश्का अभिजित घाटे (पुमसे-कांस्य), कृतिका तुषार कांबळे (पुमसे-कांस्य), झोया रिझवान खान (पुमसे-कांस्य), अपूर्वा अमित मंडल (पुमसे व क्योरुगी-कांस्य), नीती कुलकर्णी (पुमसे-कांस्य, क्योरुगी-सुवर्ण), इरा गायकवाड (पुमसे-कांस्य), तनिषा योगेश मुदलियार (पुमसे-सुवर्ण), नील सारंग धोका (पुमसे-सुवर्ण), स्वराज कुटे (पुमसे-कांस्य), वीर प्रीतम कोठारी (पुमसे-कांस्य), अरविन मनजीत पिलाकुडी (पुमसे व क्योरुगी-सुवर्ण), रिशोना जेरी लुईस (पुमसे-रौप्य), मन्नत सोना (पुमसे-कांस्य), आदिती धनंजय ओव्हाळ (पुमसे-सुवर्ण) यांनी पदकांची कमाई केली.

फिफ्थ डॅन ब्लॅक बेल्ट मास्टर रवींद्र भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली या खेळाडूंनी प्रशिक्षण घेतले असून, या कामगिरीतून त्यांचे त्यांचे कठोर परिश्रम आणि चिकाटी दिसून येते. आर. बी. होरांगी तायक्वांदो दो-जंग असोसिएशन संघ व्यवस्थापक गिरीश पाटील आणि सर्व पालकांनी पाठिंबा मुलांना प्रोत्साहित केले. मास्टर रवींद्र भंडारी, सीनियर उर्सुला पिंटो (पुणे प्रांतीय), सीनियर रोझमेरी आल्मेडा (शाळा व्यवस्थापक), सीनियर जेनिफर परेरा (शाळेचे मुख्याध्यापक), पर्यवेक्षक सीनियर एल्सा आणि श्रीमती लीना पॉल यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

See also  विजयासह भारतीय संघ आशिया कपच्या अंतिम फेरीत दाखल, थरारक सामन्यात श्रीलंकेवर मात