महावार्ता न्यूज ः महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्कार मुळशी तालुक्यातील हिंजवडीमधील गणेश सोमनाथ नवले यांना जाहिर झाला आहे. जिम्नॉस्टिक्स खेळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल न्यायालयील लढ्यानंतर गणेशला शिवछत्रपती पुरस्काराने गौरवित करण्यात येणार आहे.
शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्कारासाठी सन 2019-20 साठी गणेश नवले यांनी अर्ज केला होता. गुणांकन पूर्ण असतानाही तांत्रिक कारणांमुळे नवले यांना पुरस्कारापासून वंचित ठेवण्यात आले होते. नवले यांनी याचिका दाखल केली होती. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने पुरस्कार प्रक्रियेला स्थगित केल्यानंतर राज्य पुरस्कार समितीच्या निर्णयानुसार गणेश नवलेसह 6 खेळाडूंना पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. गणेश नवले यांनी 2 राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रासाठी पदकांची कमाई केली आहे. आंतरविद्यापीठ स्पर्धेतही गणेश पदकाची लयलूट केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याना मानाचा शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
गणेश हा पुणे येथील शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीचा खेळाडू असून आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रविण ढगे त्याला मार्गदर्शन करीत असतात. तो ग्राम विस्तार अधिकारी सोमनाथ नवले यांचा मुलगा आहे. भारतीय जिम्नॉस्टिक्स संघाचा मार्गदर्शनपदही त्याने काम केले आहे. मानाचा शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल गणेश नवलेचे अभिनंदन केले जात आहे.