महावार्ता न्यूज: भोर विधानसभेतून शिवसेना व भाजपा उमेदवारांनी माघार न घेता दंड थोपटल्याने आता चौरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे. हॅट्ट्रिक आमदार संग्राम थोपटे विरूध्द शिवसेनचे बंडखोर कुलदीप कोंडे, राष्ट्रवादी पवार गटाचे शंकर मांडेकर आणि भाजपाचे अपक्ष उमेदवार किरण दगडे अशी चौरंग कुस्ती रंगणार आहे.
थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केल्याने शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी भोर विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. शिवसेनेचे दुसरे बंडखोर कुलदीप कोंडे यांनी 5 नोव्हेंबरला भोरमध्ये जाहिर सभा घेतली आहे. या सभेचे मसेज संपूर्ण मतदारसंघात गेले आहेत.
हिंदुत्वावादी संघटनांनी पाठिंबा जाहिर केल्याने भाजपाचे किरण दगडे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. माघारीला काही तास शिल्लक असताना त्यांचा फोन नाॅट रिचेबल झाला आहे.
एकीकडे महायुतीत बंडखोरांची डोकेदुखी वाढली असताना दुसरीकडे प्रचारात काॅग्रेसचे संग्राम थोपटे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. मुळशीतील धरण भागासह भोर, वेल्हातील पहिली फेरी थोपटे यांनी पूर्ण केली आहे.