भुगावकरांच्या विक्रमी गर्दीने  मशाल लखलखली अनिल पवारांच्या विजयाची

मशालीलाच मतदानाचा संकल्प

पुणे : मुळशीतील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठीचे मतदान अवघ्या दोन दिवसांवर असतानाच, भुगावातील पदयात्रेने वातावरण ढवळून निघाले आहे. बुधवारी सायंकाळी निघालेल्या “शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’’ पक्षाच्या पदयात्रेमुळे अनिल पवारांच्या विजयाचा मार्ग प्रशस्त झाल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे. शिवसेना निवडणूक कचेरीपासून निघालेल्या या पदयात्रेत पक्षाचे जि. प. गटाचे उमेदवार आबासाहेब शेळके आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार अनिल निवृत्ती पवार यांचे शेकडो कार्यकर्ते आणि असंख्य भुगाव-ग्रामस्थ पेटलेल्या मशालींसह जयघोष करत होते. अनिल पवारांच्या होम पिचवर त्यांना मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. बघता बघता ही संख्या इतकी वाढत गेली की पद्मावती मंदिराचे प्रांगणही अपुरे पडले. “जय भवानी, जय शिवाजी’’च्या गजराने भुगाव परिसर दुमदुमून गेला. मशालीच्या प्रकाशात अनिलबापूंच्या विजयाचा मार्गही स्पष्ट झाला असे मत इथल्या ग्रामस्थांनी व्यक्त केले.


अनिल पवार म्हणाले, “ही केवळ एक पदयात्रा नसून, ती आमच्या विजयाची नांदी आहे. कामाचा माणूस कोण आहे, दूरदृष्टी ठेवून आपल्या गावासाठी आणि गणासाठी कोण उत्तम काम करू शकतो, हे लोक चांगलेच ओळखून असतात. मी आजवर तालुका स्तरावर आणि राज्य स्तरावर केलेले काम लोकांनी पाहिले आहे. माझे मतदार बंधू भगिनी सुज्ञ आहेत. ते उत्स्फूर्तपणे माझ्या प्रचारात सामील होत आहेत. बऱ्याच जणांचा उघड आणि बऱ्याच जणांचा सुप्तपणे मला पाठिंबा आहे. माझ्यावर झालेल्या अन्यायाला लोकच उत्तर देतील हे मी पहिल्या दिवसापासून सांगत आलोय. माझ्या भुगावातील आणि गणातील मतदारांनी आणि माझ्या शिवसैनिकांनी ही निवडणूक हातात घेतली आहे. त्यांच्या हाती आता आमच्या विजयाची मशाल आहे.’’


या पदयात्रेला नानासाहेब शिंदे, राम गायकवाड, कालिदास मारणे, अमित कुडले, वैभव पवळे, समीर शिंदे, आकाश भरेकर, दत्ता काळभोर, अरुण वीर, कुलदीप शेडगे, वनिता तांगडे, अर्चना सुर्वे, वैशाली महेश सणस, स्वस्तिक चोंधे, राहुल शेडगे, शिवाजी तांगडे, कालिदास शेडगे, दिनेश सुर्वे, विशाल भिलारे, योगेश चोंधे, विशाल चोंधे, मयुरी आमले, खंडू उभे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक आणि भुगावातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  मुळशीतील मारुंजी वनक्षेत्रात हुल्लडबाजी; वन्यजीवांची होरपळ, वनक्षेत्रात थर्टी फर्स्ट पार्टी कल्चरकडे वनविभागाची डोळेझाक