अपक्ष उमेदवारांना मतदान म्हणजे काँग्रेसला मतदान – शंकर मांडेकर

भोर, ता.७: पक्षाचा निर्णय डावलून ज्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे त्यांना मतदान करणे म्हणजे काँग्रेसला मतदान केल्यासारखा आहे. त्यांना मत देऊन ते वाया घालवू नका, असे आवाहन महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी केले.
कॅाग्रेसने महायुतीची मते खाण्यासाठी हे उमेदवार दिले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर हे दोन दिवसीय भोर तालुका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान मांडेकर तालुक्यातील विविध गावांना भेट देत आहेत. या दौऱ्याला भोर तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे मांडेकर यांच्यावर ठिकठिकाणी जेसीबी वरून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात येत आहे. या दौऱ्यात त्यांच्या समवेत प्रचार निरीक्षक वाय.ए. नारायण स्वामी, , रणजीत शिवतरे , विक्रम खुटवड ,जीवन कोंडे, सुनील चांदेरे, संतोष घोरपडे, अशोक शिवतरे, बाळासाहेब गरुड, स्नेहल दगडे, किसन नांगरे,सचिन आमराळे ,संतोष घोरपडे ,दशरथ जाधव ,सुनील गायकवाड हे महायुतीतील नेते पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना मांडेकर म्हणाले की गेली ५० वर्ष एकाच घरात सत्ता असूनही मतदारसंघाचा विकास झालेला नाही. या घराणेशाहीला जनता आता कंटाळली आहे. या निवडणुकीमध्ये जनता माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडून देऊन या घराणे शाही संपवणार आहे असा विश्वास यावेळी मांडेकरांनी व्यक्त केला. हे गाव भेटीदरम्यान शंकर मांडेकर यांनी पत्रकारांची संवाद साधला. निष्क्रीय आमदारांनी केलेली विकास कामे दाखवून द्यावीत असे आव्हान मांडेकर यांनी या पत्रकार परिषदेमध्ये संग्राम थोपटे यांनी दिले.
See also  महाराष्ट्राला १४ वर्षांनी सांघिक जिम्‍नॅास्टिक्समध्ये यश, ज्युनियरमध्ये एक सुवर्णासह रौप्य, सिनियरमध्ये कांस्य