डॉर्फ केटल केमिकल्स कंपनीव्दारे संगणक लॅबचे उदघाटन, पनवेलमधील ग्रामीण विद्यार्थ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण लाभणार

महावार्ता न्यूज: डॉर्फ केटल केमिकल्स कंपनीच्या सीएसआरकडून पनवेलमधील पाले बुद्रूक  गावातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळेचे उदघाटन करण्यात आले आहे. 
नवदृष्टी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पनवेलमधील तळोजातील संजय गांधी स्मारक हायस्कूल, येथे अत्याधुनिक संगणक प्रशिक्षण प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. या संगणक शाळेचे उदघाटन नवदृष्टी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. नागेश टेकाळे, डॉर्फ केटल केमिकल्सचे सीएसआर प्रमुख संतोष जगधने यांच्या हस्ते करण्यात आले. 
प्रयोगशाळेत 18 संगणक, एक प्रोजेक्टर, एक प्रिंटर, दोन एसी युनिट्स आणि प्रशिक्षित मार्गदर्शक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

” ग्रामीण विद्यार्थ्यांना आजच्या जगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक साधन आणि ज्ञान प्रदान करण्यास बांधील आहोत,” असे डॉ. टेकाळे पुढे म्हणाले की “ही संगणक प्रयोगशाळा आवश्यक संगणक कौशल्ये शिकण्याची संधी देईल, इंटरनेटचा वापर करण्याची संधी देईल आणि तंत्रज्ञानाच्या असंख्य क्षमतांचा शोध घेण्याची संधी देईल.”
डॉर्फ केटल केमिकल्सचे संतोष जगधने आपल्या मनोगतात म्हणाले की, आजच्या स्पर्धात्मक जगात विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे, “ही संगणक प्रयोगशाळा ग्रामीण विद्यार्थ्यांना डिजिटल विभाजन कमी करण्यासाठी आणि भविष्यातील संधींसाठी तयार करण्यासाठी मदत करेल.”
See also  मुळशीत लाडक्या बहिणीची साथ शंकरभाऊलाच