24 तासात इको कार चोरट्याला अटक, पौड पोलीसांची सुसाट कामगिरी

महावार्ता न्यूज ( संपादक – संजय दुधाणे):  कोण म्हणते पोलिस काम करीत नाही..मुळशीतील पौड पोलिसांनी चोरल्या गेलेल्या इको कारचा शोध 24 तासात लावून आरोपीला अटक करीत पोलिस सदैव सतर्क असल्याचे दाखवून दिले आहे.
23 नोव्हेंबरला रात्री 11:00 वा. चेतन साळुंखे यांचे मालकीची इको कार नंबर MH12GV6873 ही शेळकेवाडी फाटा घोटावडे येथून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ड्युप्लीकेट चावीचा वापर करून चोरून नेली होती याबाबत पौड पोलीसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 562/2023 कलम 379 भा.दं.वि.दाखल करून तपासकामी पोलीस हवालदार दिपक पालके यांचेकडे दिला.

वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पालके व पोलीस अंमलदार पै. अक्षय यादव यांनी गुन्ह्याचा कसून तपास केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर चोविस तासांचे आतमध्ये कार चोरी करणारा आरोपी प्रदीप दिगंबर सुदेवाड वय 25 वर्षे रा. धानकी ता. उमरखेड जि. यवतमाळ आरोपीला कारसह ताब्यात घेऊन अटक केला आहे गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार दिपक पालके करीत आहेत.
See also  पौड पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी, चोरलेले तब्बल 3 लाखांचे 25 मोबाईल केले परत