पिरंगुट – भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, लवळे येथे ‘अॅण्टी-रॅगिंग’ समितीची बैठक प्राचार्य डॉ. आर. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
बैठकीस बावधन पोलीस विभागाचे पोलीस उपनिरीक्षक म दिगंबर फड, पत्रकार प्रतिनिधी प्रा. संजय दुधाने (संपादक महावार्ता न्यूज), पालक प्रतिनिधी, वसतिगृह प्रमुख तसेच महाविद्यालयातील विभागप्रमुख, प्राध्यापक प्रतिनिधी व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, समतोल व स्नेहपूर्ण शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी कायदेशीर तरतुदी, मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
समितीचे सचिव प्रा. सुनिलकुमार पाटील यांनी मागील वर्षभरात रॅगिंग प्रतिबंधासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजना आणि कार्यक्रमांची माहिती दिली. तसेच विद्यापीठाच्या निर्देशांनुसार पुढील शैक्षणिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या नवीन उपाययोजनांची माहितीही त्यांनी बैठकीत सादर केली.
बैठकीच्या समारोपात प्राचार्य डॉ. आर. एन. पाटील यांनी सर्व संबंधित घटकांनी सजग राहून रॅगिंगमुक्त व विद्यार्थीहित केंद्रित शैक्षणिक परिसर निर्माण करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.