आख्या गावाने केली मिलिंद वाळंज यांच्या झेपी उमेदवारीची एकमुखाने घोषणा 

महावार्ता न्युज:- आंबवणे गावातील जनसेवक मिलिंद वाळंज यांनी जिल्हा परिषद सदस्य पदासाठी आंबवणे गावात विचारविनिमय सभा घेत उमेदवारीची औपचारिक घोषणा केली आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रबळ दावेदार असणार्या मिलिंद वाळंज यांना आंबवणे गावातील महिला व ग्रामस्थ यांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यासाठी झाडून गाव एकजुटीने उपस्थित राहिले.

अनेक ग्रामस्थांनी सांगितलं कि,मिलिंद दादांना कोणतेही राजकीय पद नाही. तरी त्यांच्या हातून होणाऱ्या लोकसेवेला अर्थ आहे. वीज सबस्टेशन जागा, माध्यमिक विद्यालय, गावोगावी चा मंदिर जीर्णोद्धार, अनेक ठिकाणी समाज हीत लक्षात घेता शाळा, स्मशान भूमी, रस्ते या साठी दिलेली मोफत दिलेली जमीन, आरोग्य शिभीर, पाणी प्रश्न, या सारख्या सुविधा आपल्याला मिळाल्या.
त्याबरोबर रोजगार देऊन हजारोचे अन्न, वस्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या सर्व गरजा मिलिंद दादा व त्यांचे वडील आदरणीय बाबूजी  उर्फ नंदकुमार वाळंज यांनी पूर्ण केल्या आहेत.
तर आपण बहुमताने निवडून दिल्यास आपली मुळशी तील सर्व गावाची प्रगती कशी वेगान होईल हे आपल्याला प्रत्येकाला कळायला हवं. दादा तुम्ही जि. प सदस्य पदासाठी पौड अंबडवेट गटातून उमेदवारी करा आम्ही तुम्हाला साथ देऊ असे एकमत्ताने ठरवले. बाबूजी व मिलिंद दादा करत असलेल्या कामाचे प्रत्येकाने कौतुक केले. पुढील काळात आम्ही तुमच्या पाठीशी सर्व ग्रामस्थ खंबीर पणे आहोत. अशी हमी दिली.आणि प्रत्येकाने मिलिंद दादांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचे अभिवचन दिले.
गावातूनच उदंड असा प्रतिसाद मिळाल्याने मिलिंद दादा यांनी बहू संख्येने उपस्थित राहिल्या बद्दल आभार मानले. मिलिंद दादा म्हणाले कि, माझ्या कडे अनेक नवीन कल्पना आहेत. आणि आपल्या भागात विकासासाठी मी त्या राबवणार आहे. आपण मला साथ द्यावी असे म्हणाले. या प्रसंगी मा. उपसरपंच प्रकाश मानकर, मा. आदर्श सरपंच वत्सला वाळंज, जेष्ठ समाजसेवक नंदकुमार वाळंज, पाणी पुरवठा अध्यक्ष नारायण दळवी, पो पाटील गणेश दळवी, आंबवणे गावातील विद्यमान ग्रामपंचायत सदस्या मेघा नेवासकर, अक्षरा दळवी मा. उपसरपंच गोरक्ष मेमेहताह मा तंटा मुक्त अध्यक्ष गणेश वाळंज, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, व अनेक ग्रामस्थ यांनी या प्रसंगी आंबवणे विठ्ठल मंदिरात खूप गर्दी जमली होती.
See also  मुळशी औघोगिक वसाहत एमआयडीसीत वर्ग करावी, खासदार सुळेंकडे मुळशी औद्योगिक संघटनेची मागणी