गावठी पिस्तूल बाळगल्याने मुळशीत एक जण अटक, दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई

महावार्ता न्यूज: गावठी पिस्तूल बाळगल्याबद्दल मुळशीत पोलीसांनी धडक कारवाई करीत एकास अटक केली आहे.
दहशतवाद विरोधी शाखा पुणे ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते पोलीस हे पथकासह पौड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना पथकाच्या माहितीनुसार पथकाने खांबोली तालुका मुळशी, जिल्हा पुणे येथून हनुमंत बाबुराव बारकर वय २९ वर्ष यास ताब्यात घेतले त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतुस हस्तगत केले आहे. बेकायदेशीर रित्या अग्निशस्त्र बाळगले प्रकरणी त्याच्यावर भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील अधिक तपास पौड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज यादव करीत आहे.
See also  पौड पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी, चोरलेले तब्बल 3 लाखांचे 25 मोबाईल केले परत