सात बारा , क प्रत नसताना बेकायदेशीर दाबा घेण्याचा प्रयत्न
महावार्ता न्यूज ः मुळशी तालुक्यात जमिनीचा अनाधिकृत ताबा मारणारी टोळी अनेक गावात सक्रिय झाल्याचे चित्र आहे. अंबडवेट गावातही दबंगगिरी करीत प्रगतीशील शेतकरी रामचंद्र भूमकर यांची ताबेवहिवाटीच्या क्षेत्रात ढमालेंनी अनधिकृत ताबा मारून कुंपण घालण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत २ वेळा तक्रार करूनही आरोपीची बाजू घेत पौड पोलिसांकडून अन्याय झाला आहे. आता भूमकर यांनी थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली आहे. अंबडवेट येथिल जमिन सर्व्हे ६३ मधील ३३ पैकी २५ गुंठे रामवंद्र दगडू भूमकर यांनी २०२२ साली खरेदी केले असून सदर जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर त्यांच्या नावाची नोंदही झाली आहे. सदर जमिनीचे मोजणी होऊन क प्रतही रामवंद्र दगडू भूमकर यांच्या नावावर आहे. रामचंद्र मुमकर यांची ताबेवहिवाट असूनही त्यांनी अंबडवेट वि-विन्सी कडून जमिनीवर कर्जही घेतले आहे. अचानकपणे गावातील ढमाले बंधूंनी जमिनीवर अनधिकृत ताबा मारून तारचे कुंपण टाकण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना, त्याच्या मुलांना दमदाटी करून जमिन बळकवळ्याचा प्रयत्न केला. जमिनीची कोणतीही ठोस कारदपत्रे नसतानाही त्यांनी रामचंद्र भुमकर यांना धमकावून दमदाटी करून जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न ढमाले करीत आहे. २८ वर्षापूर्वी खरेदीखत करूनही अद्याप सातबारा उताऱ्यावर नाव का नाही असे सवालही भूमकर यांनी केला आहे. मूळात ढमाले यांच्या खरेदीखतातील विक्री करणारे शेतकरी भिन्न आहे. म्हणजेच दोन्ही खरेदी खतातील घेणारे व देणारे ही नावे पूर्णपणे वेगळी आमच्या जमिनीवर ताबा सांगता येत नाही असे भूमकर म्हणाले. झालेल्या अन्यायाची तक्रार रामचंद्र भूमकर यांनी २ वेळा पोलिस स्टेशनला करूनही प्रतिसाद मिळाला नाही. अन्याय करणाऱ्या ढमाले यांनी अर्थपूर्ण पध्दतीने पौड पोलिसांना जबाब दिला. मात्र कोणतेही पुरावा नसताना तुम्ही कोर्टात जा असा अजब सल्ला पौड पोलिसांनी दिला आहे. यामुळे अन्यायग्रस्त रामवंद्र दगडू भूमकर यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांना मेल करून तक्रार केली आहे.