कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ, कसोटीपटू सदानंद मोहोळ यांच्‍या पुतळ्यांचे शनिवारी मुळशीत अनावरण

क्रीडामहर्षी पितापुत्रांना मामासाहेब मोहोळ

शैक्षणिक संस्‍थेची अनोखी मानवंदना

पिरंगुट: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे संस्थापक स्व. मामासाहेब मोहोळ व त्यांचे पुत्र कसोटीपटू स्व. सदानंद मोहोळ यांच्या अध्याकृती पुतळ्याचे अनावरण शनिवार २५ एप्रिल २०२६ रोजी मुळशीत होणार आहे. क्रीडामहर्षी पितापुत्रांना अनोखी मानवंदना एकत्रितपणे दिले जाणार आहे. 

स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या पुतळ्याचे अनावरण जेष्ठ विचारवंत माजी आमदार मा.उल्हास दादा पवार यांच्या तर स्व.सदानंद मोहोळ यांच्या पुतळ्याचे व सभागृहाचे अनावरण कसोटीपटू व निवड समितीचे माजी अध्यक्ष चंदू बोर्डे यांच्या शुभहस्ते होणार आहे. मुळशीतील पिरंगुट येथील मामासाहेब मोहोळ संस्थेच्या आयटीआय सभागृहात सकाळी 11 वाजता होणार आहे. माजी खासदार अशोक मोहोळ, नानासाहेब नवले, बाळासाहेब गांजवे, दिलीप बराटे, संग्राम मोहोळ, कुणाल मोहोळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठान पुणे व मामासाहेब मोहोळ विद्या विकास मंडळ पुणे संस्‍थेने या समारंभाचे आयोजन केले आहे. 

मामासाहेब व सदानंद मोहोळ यांचे कार्याचा आदर्श नवीन पिढीपुढे राहावा या उद्देशाने संस्थेने मामासाहेब मोहोळ यांचा पुतळा पिरंगुट येथील विद्यालयात बसविण्यात आला असल्याची माहिती नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक मोहोळ यांनी दिली आहे.

मामासाहेब मोहोळ शिक्षण संस्थेचे प्रेरणास्थान, पुणे जिल्हयाचे शिल्पकार स्वातंत्र्यसेनानी,सहकार, क्रीडा, समाजकारण, राजकारण व विशेषत: शिक्षण इत्यादी क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणारे अष्टपैलू नेतृत्व परमपूज्य मामासाहेब मोहोळ यांचे शैक्षणिक कार्य पुढे सुरू ठेवण्यासाठी यांचे सुपुत्र माजी खासदार अशोकराव मोहोळ व भारतीय क्रिकेट कसोटी पटू सदानंद मोहोळ यांनी मामासाहेब मोहोळ शिक्षण संस्थेची स्थापना १९८५ मध्ये केली. आज संस्थेच्या २८ माध्यमिक शाळा, आय.टी.आय., अपंग कल्याण केंद्र व वसतीगृह सुरू आहे. बहुतांश शाळा या ग्रामीण दुर्गम भागात आहेत.

नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठान पुणे व मामासाहेब मोहोळ विद्या विकास मंडळ पुणे आयोजित

स्व.मामासाहेब मोहोळ व स्व.सदानंद मोहोळ पुतळा अनावरण तसेच स्व.सदानंद मोहोळ सभागृहाचे उदघाटन समारंभ

शनिवार दिनांक २५ एप्रिल २०२६ वेळ – सकाळी १०:३० वाजता

स्थळ – संस्थेचे आय.टी.आय.,घोटावडे फाटा,पिरंगुट.ता. मुळशी जि.पुणे

See also  मुळशीत राष्ट्रवादीला भगदाड – पांडूरंग ओझरकर, सुखदेव तापकीर, अमित कंधारे, सुरेश हुलावळेंचा भाजपात प्रवेश