कुस्तीत भाग्यश्री फंडला रौप्य

हरिव्दार ः  राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कुस्ती आखाड्यातही महाराष्ट्राचा दम दिसून आला. महिलांच्या फ्रीस्टाईल 62 किलो गटात आहिल्यानगरची भाग्यश्री फंड ही रौप्यपदकाची मानकरी ठरली. अंतिम लढतीत जखमी झाल्याने भाग्यश्रीला सुवर्णपदकापासून वंचित रहावे लागले.
रोशनाबाद येथील योगस्थळ हॉलमधील कुस्ती मैदानात पहिल्या दिवशी एकमेेव भाग्यश्री फंडने आपले आव्हान अंतिम फेरीपर्यंत कायम राखले. विजयाची हॅटट्रिक करून भाग्यश्रीने अंतिम फेरीत मजल मारली होती. सलामीच्या लढतीत तिने पंजाबच्या स्वप्नावर 8-4 गुणांनी मात केली. उत्तरप्रदेश काशिशला 6-2, हिमाचल प्रदेश खुशी ठाकुर 6-0 एकतर्फी विजय संपादन करून अंतिम फेरीत धडक मारली होती. अंतिम फेरीत हरियाणा कल्पना विरूध्द खेळताना पायाला दुखापत झाल्याने तिचा 1 -8 गुणांनी पराभव झाला. गत गोवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भाग्यश्रीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
पुरूष गटाच्या लढतीत महाराष्ट्राचे मल्ल उपांत्य फेरीपर्यंत मजल मारू शकले. आता कांस्यपदकासाठी फ्रीस्टाईल 125 किलो गटात नाशिकचा हर्षद सदगीर, फ्रीस्टाईल 57 किलोत कोल्हापूरचा अक्षय ढेरे व  87 किलो ग्रीकोरोमनमध्ये कोल्हापूरचा दर्शन चव्हाण खेळणार आहेत.

See also  महाराष्ट्राला १४ वर्षांनी सांघिक जिम्‍नॅास्टिक्समध्ये यश, ज्युनियरमध्ये एक सुवर्णासह रौप्य, सिनियरमध्ये कांस्य