भोर, वेल्हा, मुळशीतील पैलवानांचा शंकर मांडेकर यांना पाठिंबा

मुळशी: आजपर्यंत आपण पैलवानांना मैदानात कुस्ती करताना पाहिले. पण, हेच पैलवान आत्ता भोर विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांच्याकरिता राजकीय मैदान मारण्यासाठी आखाड्यात उतरले आहेत. वस्ताद व पैलवान मंडळीनी शंकर मांडेकर यांना जाहीर पाठींबा दिला. भोर विधानसभेचे मैदान शंकर मांडेकर हेच मारणार, असा विश्वास पैलवानांनी यावेळी व्यक्त केला. ‘बजरंग बली की जय’, ‘शंकरभाऊ तूम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा जोरदार घोषणांनी पैलवानांनी परिसर दणाणून सोडला.
भूकुम येथील मुक्ताई मंगल कार्यालय येथे बुधवारी सायंकाळी पैलवान मंडळींचा स्नेहमेळावा आयोजित केला होता. यावेळी भोर, वेल्हा, मुळशीतील वस्ताद व पैलवान यावेळी छत्रपती पुरस्कार विजेते कैलास मोहोळ महाराष्ट्र चॅम्पियन बाळासाहेब बुचडे, पीएसआय विठ्ठलराव जांभुळकर, विजय साखरे, दत्ता मोहोळ, दिलीप भरणे, भरत किनाळे, विक्रम पवळे, विक्रम पारखी, बाबासाहेब कंधारे, संदीप वांजळे, राजू मते , बाबा चोरघे, शांताराम इंगवले, दत्ता मोहोळ, विलास भिलारे, पांडुरंग खाणेकर, किसन नांगरे, आबू माझीरे, अण्णा पवळे, दिगंबर केदारी, गोविंद आंग्रे, महेश मोहोळ (उपमहाराष्ट्र केसरी), पंकज हरपुडे, भूषण शिवतरे, गणेश आबा कंधारे, समीर कोळेकर, संतोष दगडे,अमित पवळे,गणेश मारणे, प्रमोद मांडेकर, रमेश पवळे, सचिन शिंदे, मुन्ना झुंजुरके, हेमंत माझिरे, हिरामण गोडांबे, हनुमंत नांगरे, मारुती वर्पे, कैलास चोंधे, प्रकाश भेगडे, प्रकाश मातेरे, राजू तांगडे, चंद्रकांत मोहोळ आदी उपस्थित होते.
पैलवान मंडळी आतापर्यंत कुस्तीच्या मैदानात डाव टाकत होते परंतु आता आपल्यातील एक सहकारी राजकीय मैदानात उतरला असल्याने शंकर मांडेकर यांना आमदार करण्यासाठी भोर, वेल्हा, मुळशीतील पैलवानांनी राजकीय मैदानात दंड थोपटले असून कुस्तीसाठी लागणारी चपळता, जलद हालचाली, डावपेचातील कसब, प्रतिस्पर्धी मल्लाला लक्ष्य करून कशा पद्धतीने चितपट करायचे याचे घेतलेले प्रशिक्षण याच्या जोरावर समोरच्या उमेदवाराला चारीमुंड्या चीत करून राजकीय मैदान मारण्यासाठी पैलवान मंडळी अंगाला तेल लावून सज्ज झाले आहेत.

शंकर मांडेकर  यांना  पैलवानांच्या समस्या त्यांना माहिती आहेत. ते पैलवानांच्या मदतीला नेहमी धावून येतात. पैलवानांने आवाज दिल्यास मांडेकर हजर असतात. पैलवानांचा आवाज म्हणून मांडेकर काम करत आहेत. त्यांना मतदार संघातील सर्व पैलवानांनी पाठिंबा दिला असून भोर, वेल्हा आणि मुळशीतील सर्व पैलवान मंडळी शंकर मांडेकर यांच्या प्रचारात उतरणार आहेत. आजी-माजी खेळाडू, वस्ताद, कुस्ती प्रशिक्षक मांडेकर यांच्या प्रचारत सक्रिय होणार आहेत. त्यामुळे राजकीय आखाड्यात त्यांचा विजय निश्चित आहे, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना शंकर मांडेकर म्हणाले की, खेळ आणि राजकारण हे खूप वेगळे आहे. कुस्ती हा माझा खेळ आहे. खेळातील कुस्तीनंतर पैलवानांच्या ताकदीवर राजकारणातील कुस्तीही मी मारणार आहे. पैलवानांच्या समस्या मी जवळून अनुभवल्या आहेत. त्या सोडवण्यासाठी माझे प्राधान्य असते. भोर, वेल्हा आणि मुळशीला कुस्तीची परंपरा जुनी असून येथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मल्ल तयार झाले आहेत. हा पारंपरिक खेळ नव्या पिढीत रुजविण्यासाठी आणि या खेळात नवे मल्ल घडविण्याचे काम मला करायचे आहे.
See also  हिंजवडी तुळजाभवानी मंदिरात आयटीयन्स भविकांची मोठी गर्दी, वाघेरे कुटुंबियाची 23व्या वर्षी मनोभावे देवीसेवा