महावार्ता न्यूज: राजगड तालुक्यातील माणगाव येथील सैनिक समाज पार्टीचे उमेदवार अनिल संभाजी जगताप यांनी भोर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांना जाहिर पाठिंबा दिला आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्या वीरवाडी , माळेगाव , निधान , सांगवी , नसरापुर , कामथडी , भोंगवली गावभेट दौऱ्यात नसरापुर येथील सभेत सैनिक समाज पाटीचे अधिकृत उमेदवार अनिल जगताप यांनी पञाद्वारे आमदार संग्राम थोपटे यांना जाहिर पाठिंबा दिला. शिवराज शेंडकर, विकास पासलकर, जितेंद्र साळुंके, राजेंद्र कडू , नानासाहेब राऊत , गणेश जागडे यांच्या प्रयत्नातून अनिल जगताप यांनी आ. थोपटे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
सैनिक समाज पार्टी या पक्षाचे वतीने भोर विधानसभा मतदार संघामध्ये उमेदवार म्हणून जगताप हे जहाज या निवडणूक चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. परंतु, भोर विधानसभेच्या रिंगणात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. संग्राम अनंतराव थोपटे हे असून भोर विधानसभा मतदार संघामध्ये केलेला विकास कामाचा झंझावात तसेच त्यांचा जनसंपर्क पाहुन त्यांचा विजय निश्चित असल्याचे सांगत आ.संग्राम थोपटे यांना जाहीर पाठींबा दिला आहे. २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदाना दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्या हाताच्या पंजा समोरील बटन दाबून त्यांना विजयी करा. असे आवाहन सैनिक समाज पाटीचे अनिल जगताप यांनी केले. कार्यसम्राट आमदार माझ्या प्रत्येक कार्यात २३ वर्षीय सेनेत सेवा केली. मी नामर्देशन केल्यानंतर भोर मतदारसंघात प्रचार करत असताना आमदार संग्राम थोपटे यांचे विकासात्मक कार्य पाहून दोन पाऊले मागे घेत मी थोपटे यांना पाठिंबा दिला असल्याचे अनिल जगताप मत व्यक्त करत संग्राम थोपटे यांना विजयी करण्याचे आवाहन यांनी केले
भोर, राजगड व मुळशी तालुक्यातील २३ उमेदवारांनीअर्ज भरले होते. त्यातील ८ उमेदवारांचे अर्ज हे छाननीत बाद करण्यात आले होते. त्यांनतर १५ उमेदवार हे वैद्य ठरले होते. उमेदवारी अर्ज भरलेल्या ९ उमेदवारांनी माघार घेतली होती अंतिम ६ उमेदवार भोर विधानसभा निवडणुकीच्यारिंगणात उतरले होते. त्यामधील उमेदवाराचे नाव, पक्ष व चिन्ह खालील प्रमाणे
नाव – पक्ष – चिन्ह १) संग्राम थोपटे – काँग्रेस – हाताचा पंजा २) शंकर मांडेकर- राष्ट्रवादी कॉँग्रेस – घड्याळ ३) अनिल जगताप – सैनिक समाज पार्टी – जहाज यांनी काॅग्रेसचे संग्राम थोपटे यांना पाठिंबा जाहीर केला आहे
४) लक्ष्मण कुंभार – दलित शोषित पिछडावर्ग अधिकार दल – ५) कुलदीप कोंडे – अपक्ष – रिक्षा ६) किरण दगडे पाटील – अपक्ष – चहाची किटली