विद्यमान आमदार फक्त स्वतःला मावळा म्हणवतात अन  किल्ल्यांकडे त्यांचे दुर्लक्ष : शंकर मांडेकर

महावार्ता न्यूज: : विद्यमान आमदार फक्त स्वतःला मावळा म्हणवतात पण महाराजांच्या गड किल्ल्यांकडे त्यांचे दुर्लक्ष असल्याची टीका भोर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांच्यावर केली.
महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुळशी (घोटावडे) येथे सभा पार पडली. या सभेला महायुतीतील घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. मांडेकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. ह्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार, भोर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शंकर मांडेकर, माजी आमदार शरद ढमाले, माजी उपसभापती रणजीत दादा शिवतरे, कात्रज दूध संघाचे चेअरमन भगवान बापू पासलकर, माजी जिल्हापरिषद सदस्य विक्रम दादा खुटवड, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रेवनाथ दारवटकर, माझी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, राष्ट्रवादी काँग्रेस भोर तालुका अध्यक्ष संतोष घोरपडे, भारतीय जनता पार्टी भोर तालुका अध्यक्ष जीवन कोंडे,भोर शहर शिवसेना तालुकाप्रमुख दशरथ जाधव, भोर तालुका आरपीआय अध्यक्ष सुनील गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेल्हा तालुका अध्यक्ष किरण राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुळशी तालुकाध्यक्ष अंकुश मोरे, भारतीय जनता पक्ष मुळशी तालुकाध्यक्ष राजभाऊ वाघ, मुळशी आरपीआय अध्यक्ष गोविंद निकाळजे, आरपीआय जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम, माजी गटनेते जिल्हा परिषद शांताराम इंगवले, माजी सभापती मुळशी बाबा कंधारे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, भारतीय जनता पक्ष युवक अध्यक्ष सागर साखरे, माजी सभापती कोमल साखरे आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी मांडेकर म्हणाले की, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला अजित दादांनी संधी दिली त्यासाठी मी आभारी आहे. आमदारांना खाजगी कामांसाठी जागा मिळतात. पण जनतेच्या कामासाठी त्यांना जागा मिळत नाहीत. विद्यमान आमदार जनतेची दिशाभूल करत आहेत असा आरोप मांडेकर यांनी यावेळी केला.

विद्यमान आमदारांना स्वतःच्या मतावर ठाम राहता येत नाही, प्रत्येक तालुक्यात ते वेगळी भूमिका घेतात, अस सांगत मांडेकर म्हणाले की, रायरेश्वेराच्या जुन्या मंदिराचे गंजलेले पत्रे त्यांना बदलता आले नाहीत, मंदिराची दुरवस्था झालेली आहे. ते मंदिर पुन्हा बांधायचं लांब राहील पण, त्या जागेचा सातबारा त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतला. असा माणूस काय विकास करणार? असा सवाल त्यांनी केला. राजगडावर जायला नीट रस्ता नाही. आश्वसने देऊन केवळ दिशाभूल करतात. आता एमआयडीसी करु म्हणतात, मग एवढे वर्ष सत्ता असताना कोणी हात बांधले होते. असा सवाल ही मांडेकर यांनी केला. मला संधी दिल्यास तालुक्याला प्रगतीच्या वेगळ्या शिखरावर नेऊन ठेवण्याचे वचन त्यांनी यावेळी दिले. सभे दरम्यान मांडेकरांनी त्यांचे व्हिजन मतदारांसमोर मांडले.
See also  पेरीविंकलचा कलाविष्काराने गाजले स्नेहसम्मेलन,बालगोपालांच्या सूत्रसंचालनाने जिंकली मने