महावार्ता न्यूज: पेरीविंकल स्कूलची कौतुकास्पद वाटचाल सुरू असून स्कूलचे रूपांतर लवकरच विद्यापीठ तयार होईल असा विश्वास 10 व 12 वी इयत्तांच्या निरोप समारंभात ज्ञानेश्वर तापकीर यांनी यावेळी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शाळेचे दिवस म्हणजे खेळणे ,बागडणे व शिकुन सुसंस्कृत होणे अशातच दहावी पर्यंत ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेला सोडून जाणे म्हणजे मित्रांसोबत व शिक्षिका सोबत बनलेले ऋणानुबंध सोडून जाताना सर्वांचे मन भरून जाते.
अश्याच भावनीक पध्दतीने पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलच्या बावधन शाखेमध्ये दहावीच्या व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आली तसेच यावेळी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना औक्षण करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचे स्वागत करून आपल्या शाळेतील अनुभव व शिक्षकाप्रती आपले विचार मांडले.
कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक व योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानेश्वर तापकीर, विद्यांचल इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक अशोक मुरकुटे,योगीराज नागरी सहकारी पसंस्थेचे कार्याध्यक्ष राजेश विधाते, ज्येष्ठ पत्रकार संजय दुधाने आदी उपस्थित होते.