बारामती : आंतरराष्ट्रीय दर्जेला साजेसे असे 23 व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल खेळाडूंसह बारामतीमधील कबड्डीशौकिन आयोजकांचे कौतुक कौतुक करीत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनच्या संयुक्त विद्यमान आयोजित 23 व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा दुसर्यांदा बारामतीत संपन्न झाली. रेल्वेच्या मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेच भव्य उद्घाटनपासून आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत असल्याची अनुभव येत राहिला. अवघ्या 72 तासांच्या कालावधीत यशस्वी संयोजनाचे शिवधनुष्य पेलल्याबद्दल एसजीए कंपनीचे गौतम छेड्डा यांचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बक्षिस वितरण समारंभात जाहिर कौतुक आले आहे. स्वःत गौतम छेड्डा यांना व्यासपीठावर बोलवून त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याचा गौरव करीत आयोजनाचे कौतुक केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, शकुंतला खटावकर व माया आक्रे तालुका उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे उपस्थित होते.
े सलग पाच दिवस चाललेल्या स्पर्धेत खेळाडूंची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था उत्तम करण्यात आली होती. मॅटवरील कबड्डीची 4 मैदाने, तीन व्यासपीठ, तीन दिशांना असलेली प्रेक्षक गॅलरीसह समारंभासाठी असलेले व्यासपीठ अशी भव्य रचना एसजीए कंपनीने निर्माण केली होती. शिवकालीन तटबंदीचे व्यासपीठासह मुख्य प्रवेशव्दारावरील कबड्डीची चित्रे लक्ष वेधी ठरली.
स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून आयोजकांनी केलेल्या अतिशय देखण्या आणि नेटक्या आयोजनाने तमाम कबड्डी रसिक मंत्रमुग्ध झाले. विम्बल्डन स्पर्धेची आठवण व्हावी, अशी मैदानाची आसन व्यवस्था असल्याचे उपस्थित प्रेक्षक सांगत होते. उदघाटन सोहळ्याला महाराष्ट्रातील प्रादेशिक नृत्ये व संगीताच्या मेजवानीने चार चांद लावले. मंत्रमुग्ध करणारी फटाक्यांची आतषबाजी व नेत्रदिपक लेझर शोमुळे सपर्धेच्या उद्घाटनाला नवी झळाळी मिळाली. पारितोषिक सोहळ्यातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तव्यगाथेचा कार्यक्रमाला प्रेक्षकांनी दाद दिली.कबड्डीच्या लीगप्रमाणे बक्षिस सोहळा रंगला. एसजीए कंपनीनी यापूर्वी नाशिकमील राष्ट्रीय युवा महोत्सव, उदगीरमधील खाशाबा जाधव स्पर्धा, गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, पुण्यातील महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व हरियाणाव पुण्यातील तील झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेच्या संयोजनात मोलाची भूमिका बजावली होती. आता बारामतीमधील स्पर्धा यशस्वी करून एसजीए कंपनीच्या क्रीडा शौकिनांची मने जिंकली आहेत.
छायाचित्र – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना गौतम छेड्डा