कौतुकास्पद, मुळशीरत्न संजय गरुड यांना जर्मनी विद्यापीठाची डॉक्टरेट

महावार्ता न्यूज: मुळशीरत्न व किराणा घराण्याचे विख्यात गायक पं. संजय गरुड यांच्या कार्याचा गौरव सातासमुद्रापार पोहचला आहे. जर्मनीच्या हेसन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पं. संजय गरुड व ह. भ. प. विजय दादा जगताप यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रधान केली आहे.

नुकतीच कोल्हापूर येथे हेसन युनिव्हर्सिटी जर्मनी तर्फे किराणा घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित संजय गरुड आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह. भ. प. विजय महाराज जगताप यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.या कार्यक्रमास अप्पर जिल्हा अधिकारी संजय शिंदे,असिस्टंट डाॅक्टरेट विठ्ठल मुर्कीवार,डाॅ कृष्णदेव गिरी,डाॅ.सुशील अग्रवाल,डाॅ.सुरेश राठोड,डाॅ गुंडोपंत सुतार,डि वाय एस पी सदानंद संदानशिव उपस्थित होते.
जर्मनीतील मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित पं. संजय गरूड हे पहिलेच मुळशीकर ठरले आहे. त्यांची जन्मभूमी लवळे गावांसह मुळशीसह सार्या महाराष्ट्रातून त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. 

 समाजामध्ये उल्लेखनीय प्रदीर्घ काळ कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना या युनिव्हर्सिटी तर्फे मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात येते. पं. संजय गरुड गेली तीस वर्ष शास्त्रीय संगीत गायक म्हणून देश -विदेशात प्रसिद्ध आहेत. किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. श्रीकांत देशपांडे यांचे ते शिष्य असून जगविख्यात सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवात त्यांनी दोन वेळा आपले शास्त्रीय गायन सादर केले आहे शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने स्थापन केलेल्या ब्रह्मनाद कला मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष असून ही संस्था गेली 25 वर्ष संगीत विद्यादानाचे कार्य करीत असून दरवर्षी ब्रम्हनाद संगीत महोत्सवाचे ही आयोजनही करते. रक्षा मंत्री स्थायी समिती (भारत सरकार) चे सभापती वर्तमान सांसद श्री .राधा मोहन सिंह द्वारा लिखित संघटन से सांसद की ओर डॉक्युमेंटरी फिल्म मध्ये ही पंडित गरुड यांनी गायन केले आहे. आगामी पथिक हिंदी चित्रपटातही गाणे गायले आहे असे फिल्म मेकिंग टीमने सांगितले आहे. सुबह बनारस सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार या डॉक्युमेंटरीमध्येही त्यांनी आपले गायन सादर केले आहे. ते आकाशवाणीचे मान्यताप्राप्त गायक असून त्यांना अनेक संस्थांनी वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
See also  मुळशीत पोलिसांचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र पथसंचलन