


पुणे : महापरिनिर्वाण दिनानिमित्त राजमाता रमाबाई आंबेडकर चौक, सिद्धार्थ नगर बावधन येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ), विकास प्रतिष्ठान, सुजाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महापरिनिर्वाण अभिवादन सभेच्या आयोजन करण्यात आले होते, यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बुद्ध वंदना घेऊन अभिवादन सभेची सुरुवात करण्यात आली, या अभिवादन सभेत बोलताना बावधन पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी बाबासाहेबांचा जीवनपट उलगडून सांगितला. तसेच माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील, माजी सरपंच वैशाली कांबळे, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक उमेश कांबळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.















