महावार्ता न्यूज: भोर-राजगड-मुळशी मतदारसंघातील चौरंगी लढतीत मुळशी तालुक्यात 61.46%, राजगड (वेल्हा) तालुक्यात 73.86%, भोर तालुक्यात 73.54% टक्के ठासून मतदान झाले असून आता निकाल घासून लागणार असल्याची चर्चा रंगली आहे. भोर व वेल्ह्यातील विक्रमी मते 2024 च्या आमदाराचे भवितव्य ठरविणार आहे. राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर हे आमदार झाल्याबद्दल अभिनंदनाचे नमस्कार फ्लेक्स झळकले आहेत.
भोर-राजगड-मुळशी मतदारसंघात महाविकास आघाडीचे संग्राम थोपटे, महायुतीचे शंकर मांडेकर, अपक्ष उमेदवार किरण दगडे आणि अपक्ष कुलदीप कोंडे हे या चौरंगी लढतीत उमेदवार रिंगणात आहेत.
भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघात 4,30,278 मतदार आहेत त्यापैकी, एकूण 2,91,704 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता त्यामध्ये 1,56,912 पुरुष आणि 1,34,789 महिला व 3 अन्य मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यामुळे एकूण 67.79% टक्के मतदान नोंद झाली आहे.
भोर-राजगड-मुळशी मतदारसंघातील एकूण मुळशी तालुक्यात (1,26,607 मत) 61.46%, राजगड (वेल्हा) तालुक्यात (39,921 मत) 73.86%, भोर तालुक्यात (1,25,176 मत) 73.54% टक्के मतदान झाले, तर भोर तालुक्यापेक्षा मुळशी तालुक्यात फक्त 1,431 मतदान जास्त झाले आहे. त्यामुळे निकाल कोणाच्या बाजूने लागणार याची चर्चा रंगली आहे.