मुळशीत मतदान झाले ठासून, निकाल लागणार घासून, 60 टक्क्यांपेक्षा अधिक झाले मतदान

महावार्ता न्यूज: चौरंगी लढतीच्या भोर-राजगड-मुळशी मतदारसंघातील मुळशीत सरासरी 60 टक्क्यांपेक्षा अधिक ठासून मतदान झाले असून आता निकाल घासून लागणार असल्याची चर्चा रंगली आहे.
लोकसभा निवडणुकीला घसरलेला मतांचा टक्का विधानसभा निवडणुकीत उंचावलेला पाहायला मिळाला. पिरंगुट, भूगाव, माणमध्ये उशिरापर्यंत रांगा दिसून आल्या.

महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे, महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर व अपक्ष उमेदवार किरण दगडे यांनी तालुक्यातील महत्वाच्या मतदान केंद्राना भेटी दिल्या.

सायंकाळी पाच वाजेपर्यंत भोर विधानसभा मतदारसंघात एकूण :- 250295 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता त्यामुळे एकूण 58.17% मतदान झाल्याची नोंद आहे.
पिरंगुट मतदान केंद्रात 10660 पैकी 6819 मतदारांनी मतदान केला. एकूण 63 टक्के पिरंगुटमध्ये मतदान झाले अंबडवेट गावात एकूण मतदान ७६.५६ टक्के विक्रमी मतदान झाले.

कोळावडे गावात वयाच्या 100व्या वर्षी सखुबाई मारुती उभे यांनी मतदानाचा हक्क बजावला.

मुळशीत बहुतांशी मतदान केंद्रावर सकाळपासूनचं वृद्धापासून ते नवतरुण मतदारांची मोठी गर्दी झालेली पहायला मिळाली. शहरी व ग्रामीण मतदान केंद्रावर उत्साही मतदारांची उपस्थिती दिसून येत होती. सायंकाळी 6 वाजता मतदान सुरू होते त्यावेळी शेवटची आकडेवारी आली
घोटावडे, लवळे, माण मधील काही ठिकाणी मतदान यंत्र हळुवारपणे चालत असल्याने दुपारपर्यंत उन्हातान्हात मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान सूरु असल्याची माहिती तहसीलदार रणजित भोसले यांनी दिली .

भोर विधानसभा मतदारसंघ  228 मतदान केंद्रासाठी 1368 कर्मचारी व  शांततेत मतदान होण्यासाठी 300 पोलिस तैनात करण्यात आले होते. मुळशीत शांततेत लोकशाहीचा उत्सव साजरा केल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत. 
See also  मी जनतेची काम करायला रोज भोर, राजगडला येईल – शंकर मांडेकर