महावार्ता न्यूज: महाशिवरात्री निमित्त मुळशीत वार्षिक झेंडावंदन , ध्यान, स्नेहमिलन, पंचायत समिती व जिल्हा परिषद नव निर्वाचित सदस्यांचा सत्कार, 12 ज्योतिर्लिंग दर्शन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . धनवे वाडी येथील ब्रह्माकुमारीज च्या हृदयमोहिनीवन या रिट्रीट सेंटर मध्ये महाशिवरात्र साजरी करण्यात आली.
करुणा दीदीजी यांनी गहन शांती ची ध्यान अनुभूती करून दिली , अश्विनी दिदीजी यांनी शिवरात्री चे आध्यात्मिक रहस्य समजावून सांगितले . डॉ. गणेश जाधव यांनी शारीरिक उपवास अर्थात पूर्णपणे शरीराला विश्रांती देणे व मनाला ईश्वरीय आठवणीत मग्न करणे शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी किती आवश्यक आहे ते स्वानुभवाने स्पष्ट केले .
जिल्हापरिषद सदस्यपदी शांताराम दादा इंगवले, मुळशी पंचायत समिती सदस्य पदी राहुल पवळे व प्रवीण धनवे निवडून आले त्याबद्दल सर्वांचा सत्कार सन्मान करण्यात आला . तसेच त्यांच्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या . सर्वांनी समाजसेवेचे विकासाचे कार्य करण्याची तसेच जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर राहण्याची ग्वाही दिली.
माऊली बोडके यांनी शेती फायदेशीर होण्यासाठी ऑरगॅनिक शेती करावी व मनाच्या शांती साठी ब्रह्मा कुमारीज् चे राजयोग मेडिटेशन करावे असे आवाहन केले .
या प्रसंगी यशराज पारखी यांनी श्रीमंती ही फक्त पैशांचीच नसते तर कौतुबिक , वैचारिक , सामाजिक व आध्यात्मिक ही असते . आपण सर्वच प्रकाराच्या श्रीमंती साठी प्रयत्नशील रहावे तर आपले जीवन खरे सार्थकी लागेल हे विषद केले . तसेच सर्वांनी राजयोग मेडिटेशन शिकून जीवनात त्याचा वापर करावा असे सर्वांना आवाहन केले . दीप प्रज्वलन नंतर शिव परमात्मा यांचे गीत व नृत्य सादर करण्यात आले . या नंतर 12 ज्योतिर्लिंग दर्शनासह माहिती देण्यात आली .सर्वांना सात्विक महाप्रसाद अर्थात ब्रह्मा भोजन देण्यात आले .
कार्यक्रमासाठी भाग्यश्री दीदी व शंकर भाई यांनी सूत्र संचालन केले , स्वप्नील भाई यांनी साउंड सिस्टीम सांभाळली . ज्योती दिदीजी यांनी परमात्मा शिव यांचे, सर्व मान्यवरांचे , सेवाधारींचे व कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचे मनापासून आभार मानले