


महावार्ता न्यूज ः आमचं ठरलंय! कुणी कितीबी काहीही प्रचार करू दे! अनिलबापूंवर अन्याय झाला. आता त्यानं मशाल हातात घेतली. आता आम्ही मशालच निवडणार. आम्हाला आमचा कारभारी सुशिक्षित आणि कामाचा माणूस पाहिजे. पंचायत समितीत आम्ही अनिलाबापुंनाच निवडून देणार असा निर्धार भूगाव- मुठा गणातील पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रकट झाला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पिरंगुट-भुगाव जि. प. गटाचे अधिकृत उमेदवार आबासाहेब उर्फ माधवराव पांडुरंग शेळके आणि भुगाव पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार अनिल निवृत्ती पवार यांच्या झंझावाती दौऱ्यामुळे भूगाव, भुकूमसह मुठा खोऱ्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.

गेली २५ वर्षे अनिल पवार राजकारणात आहेत. पण त्यांना अजूनही कुठलं पद नाही. पद नसताना हा माणूस इतकी कामे करतोय तर निवडून आल्यावर हा माणूस मोठा बदल घडवेल, अशी भावना भूगावातील अनेक लोक खाजगीत व्यक्त करत आहेत. गावकी-भावकीच्या पलीकडं आपण आपल्या गावाच्या कल्याणाचा आणि गणाच्या विकासाचा विचार केला पाहिजे. योग्य उमेदवारच निवडून दिला पाहिजे, अशी चर्चा सध्या भुगावात रंगली आहे.
अनिल निवृत्ती पवार हे गेली २५ वर्षे मुळशी तालुक्यात राजकारण, समाजकारण, पायाभूत सुविधा, शिक्षण, कला, क्रीडा, पर्यावरण अशा अनेक क्षेत्रांत कार्यरत आहेत. २०१३ साली त्यांनी मुळशी तालुक्यातील २५ हजारांहून अधिक नागरिकांना आधार कार्ड काढून देण्याचे अभियान पूर्ण केले. शालेय विड्यार्थ्यासाठी ते करिअर गायडन्स शिबिरे दरवर्षी आयोजित करतात. रामनदी स्वच्छता अभियान, रामनदी जलदिंडी, रामनदी भूजल अभियान, रामनदी परिक्रमा अशा लोकसहभागाच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मृतप्राय होत चाललेल्या रामनदीचे संवर्धन करण्याचा त्यांनी ध्यास घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज जलाशयातील ५००० ट्रक गाळ काढण्याचे कामही त्यांनी केले. त्यामुळे भुगावातील वाढत्या लोकसंख्येला अतिरिक्त पाणी मिळाले. ते दरवर्षी करिअर गाइडन्स व शैक्षणिक व्याख्यानमालांचे आयोजन करत आले असून, तालुक्यातील असंख्य विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पुस्तक प्रदर्शन, वाचन चळवळ असे विधायक उपक्रम ते नेहमीच आयोजित करत असतात. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर यांसारखे उपक्रम आणि वारकरी संगीत संमेलनासारखे आध्यात्मिक उपक्रमही ते आयोजित करत आले आहेत.

६ जून हा शिवराज्याभिषेकाचा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा व्हावा, यासाठी अनिल पवारांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. यामुळेच आता हा दिवस महाराष्ट्र शासनाकडून सर्व शासकीय संस्थांत ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून अधिकृत साजरा केला जातो. ‘शिवराज्याभिषेक – भारताच्या इतिहासातील असामान्य घटना’ हा ग्रंथही त्यांनी संपादित व प्रकाशित केला आहे. इतिहास आणि सामाजिक विषयांत मौलिक कार्य करणार्या व्यक्तींचा राज्यस्तरीय ‘शिवस्वराज्यभूषण’ पुरस्काराने ते दरवर्षी सन्मान करत असतात. मुळशी धरणग्रस्तांना हक्काचे घर आणि गावठाण मिळावे यासाठी अनिल पवारांनी जनजागृतीचे, संघटनात्मक संघर्षाचे कार्य केले आहे. २०२५ साली अखिल महाराष्ट्र मुळशी परिषदेचे त्यांनी आयोजन केले होते. विविध कुस्ती स्पर्धाच्या आयोजनासह, सिंहगड-राजगड-तोरणा या आंतरराष्ट्रीय ट्रेल मॅरेथॉनच्या आयोजनातही ते सक्रिय असतात.

अशा कार्यक्षम आणि सुसंस्कृत उमेदवाराला आपण पंचायत समितीत पाठवायला हवे असे भुगावातील फक्त शिवसैनिकच नाही, तर सर्वसामान्य नागरिकही म्हणू लागले आहेत. भूगावच्या समस्या अनेक आहेत. रस्ते, विज, पाणी, घनकचरा, ट्राफिक, बालोद्याने यांसारखे अनेक प्रश्न इथे गंभीर आहेत. त्या समस्यांची जाण अनिल पवारांना असल्याने आणि आजवर त्यांनी तालुक्याच्या व राज्याच्या पातळीवर अनेक विधायक उपक्रम राबवलेले असल्याने असा सक्षम, दूरदृष्टीचा उमेदवार पंचायत समितीत पाठवण्याचा भुगावकरांचा इरादा पक्का झाला आहे.
राष्ट्रवादीकडून चुकले शिलेदार
कोण आहे मतदारांचा सुपरस्टार
शिवसेना उबाठा गटाचे अनिल पवार?
👇👇👇👇👇
https://www.instagram.com/reel/DUSRpn7DLFT/?igsh=cms4d2M0ZW5pYWcw













