महावार्ता न्यूज: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पिरंगुट-भुगाव जि. प. गटाचे अधिकृत उमेदवार आबासाहेब उर्फ माधवराव पांडुरंग शेळके आणि भुगाव पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार अनिल निवृत्ती पवार यांच्या झंझावाती दौऱ्यामुळे मुठा खोऱ्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. सर्वसामान्य ग्रामस्थ इतके त्रस्त आहेत की त्यांनी यंदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बहुमताने विजयी करायचे असे मतदाराचे एकमत झाले आहे.

मुठा खोऱ्यातील अनपेक्षित प्रतिसाद पाहून विरोधकही अचंबित झाल्याचे चित्र अनेक गावात दिसून आले. आता स्थानिक उमेदवारापेक्षा कामाचा माणूस असणाऱ्या आबासाहेब शेळके, अनिल पवार यांच्या पाठिशी येथील मतदार उभा होत आहे.
अनिल निवृत्ती पवारांसारखा एका तडफदार, कर्तबगार आणि तालुक्यात दांडगा जनसंपर्क असलेला उमेदवार सेनेत आल्याने गावाखेड्यातला, वाड्यावस्त्यातला शिवसैनिक मोठ्या उत्साहाने कामाला लागला आहे. रस्ते, वीज, पाणी, शेती, महिलांसाठी लघुद्योग, बचत गटांना साहाय्य आणि तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी मी आणि माझा पक्ष नेहमी सज्ज असू, असे अनिल निवृत्ती पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, “धरण उशाला आणि कोरड घशाला अशी मुठा खोऱ्यातील गावांची स्थिती झाली आहे. या भागात अनेक समस्या आहेत. जो भाग विजेची निर्मिती करतो, त्याच भागातील आमचा शेतकरी, आमच्या भगिनी मात्र सतत पाण्यासाठी त्रस्त आहेत. विजेच्या समस्येने अंधारात अख्खी पिढी ढकलली गेली आहे. या सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठीच मी मैदानात उतरलो आहे. जनतेने आता ही निवडणूक हातात घेतली असून, या खोऱ्यात मशाल पेटवण्याचा निर्धार पक्का झाला आहे. शिवसैनिक इर्षेने कामाला लागले असून, विजय खेचून आणायचा त्यांचा संकल्प दृढ झाला आहे.’’
आजवर इथे अनेकांना आम्ही सत्ता दिली, पण आमच्या आयुष्यात आजही अंधारच आहे. आता आम्ही नव्या चेहऱ्यांना संधी देऊ. काम करण्याची क्षमता आणि तळमळ असणाऱ्या उमेदवारांनाच आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर पाठवू असे कोळावडे येथील उभे यांनी सांगितले.

आबासाहेब शेळके आणि अनिल पवार या शिवसैनिकांची कार्यक्षमता आणि आजवरचा कामाचा आवाका मोठा आहे. आम्हाला आता दूरदृष्टी असलेले हे नेते हवे आहेत. म्हणूनच आम्ही या दोन्ही उमेदवारांना यंदा विक्रमी लीड देणार आहोत, असा निर्धार मुठा खोऱ्यातील शिवसैनिकांनी व्यक्त केला.
वाढत्या महागाईला तोंड कसे द्यायचे हा प्रश्न इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला रोजच सतावत आहे. रस्ते किंवा कोणत्याही पायाभूत शासकीय सुविधा या मूठभर कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठीच आहेत का असा सवाल आता निवडणुकीच्या तोंडावर ऐरणीवर आला आहे. जनता आता परिवर्तन घडवणारच. अंधारलेल्या मुठा खोऱ्यात शिवसेनेची मशाल पेटणारच असा असंख्य शिवसैनिकांना पक्का विश्वास आहे.
जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुठा खोऱ्यातील गावांच्या सोयीसुविधांचा प्रश्न, गावकर्यांच्या समस्या आता चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.