मुळशीत जिल्हा बँकांचा क्रांतिकारी निर्णय,  विकास सोसायटींमार्फत भात खरेदी करणार

महावार्ता न्यूज:  मुळशी तालुक्यामध्ये लवकरच भाताचं पिक काढायला येणार आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक विकास सोसायट्यांच्या माध्यमातून भाताची खरेदी करणार असून वेळी भात खरेदी साठी प्रती किलो २४ रुपये दर शेतकऱ्यांना देणार असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी केले आहे. भात खरेदीच्या या क्रांतीकारी निर्णयाचे राज्यात कौतुक सुरू झाले आहे. 
पौड येथे जिल्हा बॅंकेत आज झालेल्या बॅंक कर्मचारी व सहकारी सोसायटी सचिवांच्या सभेत ते बोलत होते.
भात खरेदी करताना व्यापारी हे शेतकर्‍यांना हमी भावापेक्षा कमी किंमत देऊन त्यांची आर्थिक पिळवणूक करतात. आता बॅंक भात खरेदी करताना शेतकऱ्याला त्याच्या भाताचे वजन झाले की लगेचच त्याच जागेवर वजनाप्रमाणे ठरलेल्या २४ रुपये प्रती किलो दरानुसार झालेल्या भाताच्या वजनानुसार लगेचच धनादेश देणार आहे. भात खरेदी करताना तज्ञ व्यक्तीची नेमणूक करणार आहे .हि व्यक्ती भाताची गुणवत्ता पाहून त्याप्रमाणे दर ठरवणार आहे.भात खरेदी साठी सोसायट्यांच्या चेअरमन , सचिव, संचालकांनी पुढाकार घ्यावा. खरेदी केलेल्या भातावर पुढिल प्रक्रिया करून त्या तांदळाची विक्री बँकेच्या विवीध विक्री केंद्रांमार्फत मार्फत करणार आहे.महाराष्ट्र सहकार मंडळाचे प्रमुख डॉ. मिलींद आकरे या संदर्भात मार्गदर्शन करीत आहेत. “मुळशी ॲग्रो” या नावाने शेतक-यांचा तांदुळ बाजारपेठेमधे विक्रीसाठी उपलब्ध करून देणार असल्याचेही चांदेरे यांनी यावेळी सांगीतले . तालुक्यातील विकास सोसायट्यांना भात खरेदी उपक्रमाने उभारी मिळेल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भात खरेदीतून मिळणाऱ्या नफ्यामुळे शेतकरी सभासदांना लाभांश मिळेल . प्रतेक सोसायटीला मागणीप्रमाणे कॅश क्रेडीट कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना भाताचा योग्य भाव मिळून चार पैसे शेतकऱ्यांच्या हातात यावेत हा प्रामाणिक उद्देश या मागे आहे. नफा तोट्याच्या पलीकडे यातुन शेतक-याचे हीत जपण्याचा प्रयत्न आहे. निरज पवार यांनी यावेळी शेतक-या मार्गदर्शन केले. 
यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, बॅंकेचे कार्यलक्षी संचालक अंकुश उभे ,विभागीय अधिकारी सुरेश नांगरे , वसुली अधिकारी राजेंद्र मारणे, पालक अधिकारी सुनील खताळ, मावळमधुन आलेले निरज पवार , तालुक्यातील बॅंकेचा संपूर्ण अधिकारी , सेवक वर्ग व विकास सोसायटींचे सर्व सचिव उपस्थित होते. सचिव अतुल मेंगडे यांनी सुत्रसंचालन केले. हनुमंत चोंधे यांनी आभार मानले.
See also  मामासाहेब मोहोळ स्मरणार्थ महाराष्ट्र केसरीचे गदेचे पुण्यात पूजन, 1983 पासून मोहोळ कुटुंबियांकडून देण्यात येते मानाची गदा