ब्रह्माकुमारीज पिरंगुट सेवाकेंद्राचा वर्धापनदिन ७०० अनुयायांनी केला साजरा

महावार्ता न्यूज: ब्रह्माकुमारीजच्या मुळशीतील मनमोहिनी वन सेवाकेंद्रात पिरंगुट सेवाकेंद्राचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विकर्म विनाश भट्टी यांनी नाविन्यपूर्ण  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

प्रत्येक मनुष्याचा पुरुषार्थ असतो कि आपण सत्कर्म करावे व पुण्य कर्म करावेत. परंतु अगोदर या जन्मात व त्या आधीच्या जन्मात केलेली वाईट कर्मे कशी चुक्तू करावीत याचे सुंदर मार्गदर्शन आदरणीय ब्रह्माकुमार रमणी भाई यांनी केले.
सदर विषय विचित्र व नाविन्यपूर्ण वाटत असला तरी सर्व मनुष्यात्मांना अतिशय महत्वाचा आहे.
या कार्यक्रमात त्यांनी आपल्या आधी केलेली विकर्म पतित पावन परमात्म्या समोर मांडावीत व त्याचे परिमार्जन करण्याचे निवेदन करण्याचा सुंदर विधी प्रात्यक्षिक करून सांगितला.
ब्रह्माकुमारीजच्या पिरंगुट शाखेचा वर्धापनदिन निमित्त दीप प्रज्वलन केले तसेच सर्वांनी केक कापून आनंद साजरा केला.


या कार्यक्रमाची सिद्धी यातच होती कि खूप लोकानी अतिशय सुंदर सुंदर अनुभव आलेत व ते बऱ्याच लोकांनी अनुभव कथन केलेत. जवळ जवळ ७०० अनुयायांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. सर्वांना कार्यक्रमा नंतर अतिशय आनंदी व हलके झाल्याचा अनुभव आला. आदरणीय ब्रह्माकुमार शंकर भाई यांनी या कार्यक्रमाचे सूत्र संचालन केलेत. तसेच आदरणीय करुणा दीदी यांनी या कार्यक्रमासाठी आशीर्वचन दिले. आलेल्या सर्व बंधु भगिनींचे स्वागत ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांनी केले.

See also   गणेश नवलेला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहिर, पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव