महावार्ता न्यूज: ६८व्या महाराष्ट्र केसरी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी राष्ट्रीय तालीम संघ पुणे शहर संघ निवड चाचणी कुस्ती स्पर्धचे आयोजन केल्याची माहिती राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस शिवाजीराव बुचडे यांनी दिली
हि स्पर्धा रविवार दिनांक ८ मार्च २०२६रोजी छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे सकाळी ९ते११यावेळेत कुस्तीगीरांची वजने होतील सायं ३वाजेंनंतर कुस्ती स्पर्धेला प्रारंभ होईल तरी पुणे शहर जिल्ह्यातील सर्व वस्ताद कुस्तीगीर, कुस्ती शौकीन यांनी याची नोंद घ्यावी उपस्थित राहावे हि विनंती हि स्पर्धा गादी व माती अशा दोन्ही विभागात होणार असून यात ५७कि,६१,६५,७०,७४,७९,८६,९२,९७, किलो आणि मानाच्या महाराष्ट्र केसरी किताबासाठी ८६ते१२५किलो या वजन गटांचा समावेश आहे स्पर्धेसाठी सहभागी होण्यासाठी जन्म २००६किंवा त्या पुर्वीचा असावा २००७मधील जन्म असलेल्या खेळाडूंना वैद्यकीय प्रमाणपत्र आणि पालकांचे संमतीपत्र अनिवार्य आहे आधार कार्ड, पासपोर्ट,जन्म दाखला यापैकी मुळ पुराव्यासोबत असणे आवश्यक आहे तसेच वजनामध्ये १किलोची सवलत दिली जाणार असून खेळाडू पुणे शहर जिल्ह्यातील रहिवासी असणे बंधनकारक असल्याचे राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस शिवाजीराव बुचडे यांनी सांगितले