पिरंगुट ग्रंथालयात गुरूवारी महावार्ताच्या 14 व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन, स्पर्धा परिक्षेतील मुळशीकर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्रही

महावार्ता न्यूज ः मुळशीतील पहिला ऑनलाईन न्यूजपेेपर असणार्‍या महावार्ताच्या 14 व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन तहसीलदार रणजीत भोसले यांच्या हस्ते गुरूवारी 9 नोव्हेंबर रोजी  पिरंगुटमध्ये होणार आहे. 
मुळशीतील पिरंगुट ग्रामपंचायतीने उभारलेल्या ग्रंथालय व अभ्यासिकेत संध्या. 6 वाजता सरपंच चांगदेव यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशन व मार्गदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे. शिवसेना पुणे जिल्हा  प्रमुख बाळासाहेब चांदेरे, जिल्हा बँकचे उपाध्यक्ष  सुनील चांदेरे, मुळशी  महिला काँग्रेस कमिटी अध्यक्षा सौ. निकिता सणस व पिरंगुटचे  ग्रामविकास अधिकारी  बी. आर. पाटील पाहुणे पाहुणे म्हणून उपस्थिती रहाणार आहेत. 

कार्यक्रमात पीएसआयपदी निवड झालेल्या सौ. अनिता अशोक हुलावळेंचा गौरवही केला जाणार आहे. प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर तहसीलदार रणजीत भोसले व पीएसआय अनिता हुलावळे हे मुळशीतील स्पर्धा परिक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे महावार्ताचे संपादक संजय दुधाणे यांनी सांगितले आहे. 
मुळशीतील पत्रकारांच्या सहकार्यातून पिरंगुट ग्रामपंचायतीने गतवर्षी ग्रंथालय-अभ्यासिका – वाचनालय प्रकल्पाची उभारणी केली आहे. लेखक, संपादक संजय दुधाणे व पत्रकार प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाव्दारे हा प्रकल्प प्रगतीपथावर आहे. 25 पेक्षा अधिक विद्यार्थी अभ्यासिकेचउ लाभ घेत असून वृत्तपत्रे वाचनानालाही मोठा प्रतिसाद असल्याचे प्रदिप पाटील यांनी सांगितले. 

महावार्ता हे मुळशीतील सर्वात पहिला ऑनलाईन न्यूजपेपर आहे. 25 हजारपेक्षा अधिक महावार्ताचे नियमीत वाचक असून नुकतीच  भारत शासनाच्या न्यूजपेपर संस्थेनही महावार्ताना मान्यताही दिली आहे. 
See also  लोकसभा निवडणूकीसाठी मुळशी सज्ज, पोलीस बंदोबस्तात साहित्याचे वितरण