तहसीलदार रणजीत भोसलेंच्या हस्ते महावार्ता दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन, पिरंगुट ग्रंथालयात रंगली स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनाची मैफील

महावार्ता न्यूज ः मुळशीतील पहिला ऑनलाईन न्यूजपेेपर असणार्‍या महावार्ताच्या 14 व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन तहसीलदार रणजीत भोसले यांच्या पिरंगुटमध्ये करण्यात आले. यानिमित्ताने स्पर्धा परिक्षा विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाची स्मरणीय मैफील रंगली.
मुळशीतील पिरंगुट ग्रामपंचायतीने उभारलेल्या ग्रंथालय व अभ्यासिकेत मुळशीचे कर्तव्यतत्पर तहसीलदार रणजीत भोसलेंच्या हस्ते झाले. याप्रसंगी शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे, जिल्हा बँकचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, पीएसआय सौ. अनिता अशोक हुलावळे, संपादक संजय दुधाणे, कृषी  उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम गायकवाड, पिरंगुटचे मा. उपसरंपच विकास पवळे, चंद्रकांत चोरगे, मुळशी पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद माझिरे, पत्रकार प्रदिप पाटील, पत्रकार कालिदास नगर आदी मान्यवर उपस्थित होते.

इंजिनीअर ते मुळशी तहसीलदार, मा. रणजीत भोसले यांचा प्रेरक प्रवास

👇👇👇👇👇👇👇
https://www.facebook.com/groups/1lakhmulshikar/permalink/2147516648959403/?mibextid=Nif5oz


कार्यक्रमाच्या सुरूवातीला पीएसआयपदी निवड झालेल्या सौ. अनिता अशोक हुलावळे यांनी आपली यशोगाथा सांगून उपस्थितींची मने जिंकली. 10 वर्षांच्या मुलाची आई व एक गृहिणी ते पीएसआय हा प्रवास हुलावळे यांनी शब्दचित्रित केला. तहसीलदार रणजीत भोसले यांनीही आपली इंजिनिअर ते तहसीलदार ही सफर सांगून उपस्थितींना प्रेरीत केले.

भोसले यांचे मार्गदर्शन सुरू असताना अचानक वीज गेली.क्षणभरातउपस्थितीतांनी मोबाईल स्टार्चने परिसर उजळविला. बाहेर अंधार असताना पिरंगुटच्या सरस्वतीच्या ज्ञानमंदिरात ज्ञानदानाचे दिप उजाळले होते. अनोखे असे दृश्य मुळशीत प्रथमच प्रकटले होते.


प्रकाशनानिम्मित्त पीएसआय अनिता हुलावळे यांचा विशेष सत्कार तहसीलदार रणजीत भोसलेंच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी दुर्मिळ स्वातंत्र्यसैनिकांची पुस्तके संजय दुधाणे यांच्यावतीने पिरंगुट ग्रंथालयास भेट देण्यात आली. याचा स्वीकार विनोद पवार यांनी केला.

महावार्ता हे मुळशीतील सर्वात पहिला ऑनलाईन न्यूजपेपर आहे. 25 हजारपेक्षा अधिक महावार्ताचे नियमीत वाचक असून नुकतीच भारत शासनाच्या न्यूजपेपर संस्थेनही महावार्ताना मान्यताही दिली असल्याचे दुधाणे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप पाटील यांनी केले.

गृहिणी, 10 वर्षाच्या मुलाची आई जेव्हा पीएसआय होती..

मुळशीची रागिणी PSI सौ. अनिता अशोक हुलावळेयांची संघर्ष गाथा

👇👇👇👇👇👇👇
https://www.facebook.com/groups/1lakhmulshikar/permalink/2147497368961331/?mibextid=Nif5oz

See also  पीडीसीसी सभासदांना सुनील चांदेरेंच्या हस्ते 10 % लाभांशाचे वितरण