मुळशीत काँग्रेस-भाजपाचे शक्तिप्रदर्शन, राष्ट्रवादीचे गाव बैठकांतून समाजकारण, सुनील चांदेरेंच्या गाव बैठकांना मोठी गर्दी

महावार्ता न्यूज: मुळशीत रविवारचा सुट्टीचा दिवस राजकीय शक्तिप्रदर्शनचा ठरला. काॅग्रेस, भाजपाकडून जंगी कार्यक्रम होत असताना राष्ट्रवादीचे नेते सुनील चांदेरे यांच्या विकास सोसायट्यांच्या बैठकांनाही मोठी गर्दी दिसून आली. 
पुणे जिल्हा बॅंकचे उपाध्यक्ष सुनील चांदेरेंनी पावसाळी वातावरणात विकास सोसायट्यांच्या वार्षिक सभांचा जोरात धडाका सुरू ठेवला.
चांदेरेंच्या कोळवण खो-यात वार्षिक सभांच्या निमित्ताने वातावरण ढवळुन निघाले

 

सभेत राजकारणावर न बोलता नाही पीडीसीसी  बॅंकेची कामे सांगता सांगता अजित पवारांचे सहकारातील काम त्यांनी लोकांपर्यंत पोहचवले. राष्ट्रवादीच्या माध्यमातून शेतक-यांना मिळालेला ६ टक्के व्याजाचा परतावा, नियमित कर्जपरफेड करणा-या शेतक-यांना दोन टप्प्यात मिळालेले पन्नास हजारांचे अनुदान या दोन बाबी ते लोकांना समजावुन सांगितल्या. पावसाळा असताना मंदिर भरून होणा-या सभा ह्या पहिल्यांदाच पहायला मिळाल्या. या सभांच्या माध्यमातुन चांदेरे राष्ट्रवादीचे काम लोकांपर्यंत पोहचत असल्याची चर्चा तालुक्यात आहे.
मुळशी तालुक्यात सहकार तळागाळात पोहचविण्यासाठी सुनील चांदेरे परीश्रम घेत असून गावच्या विकास सोसायट्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांमधुन जिल्हा बॅंक आणि सहकाराच्या विविध योजना शेतक-यांना समजावुन सांगण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. याला मुळशीतून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
कोळवण ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षीक सभा सकाळी १० वा. तर दुपारी १२ वा. नाणेगाव विकास सोसायटीची सभा नाणेगाव येथे त्यांना घेतली. खूप मोठ्या संखेने शेतकरी सभासद यावेळी जमले होते. यावेळी राष्ट्रवादी काॅग्रेसचे अध्यक्ष अंकुशभाऊ मोरे, मा. पंचायत समिती सदस्य भगवान नाकती , सहकारातील नेते माऊली कांबळे, मार्केट कमिटी संचालक रामभाऊ गायकवाड , कारखाना संचालक पोपटराव दुडे, जेष्‍ठ नेते बबनराव धिडे, चेअरमन माऊली साठे , यशवंतराव गायकवाड , पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे विभागीय अधिकारी सुरेश नांगरे , वसुली अधिकारी राजेंद्र मारणे ,विकास अधिकारी माणिक भालेराव , सोसायटींचे चेअरमन , व्हा. चेअरमन ,संचालक मंडळ , सचिव व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.
See also  आंतरशालेय नृत्यस्पर्धेत पेरिविंकल अव्वल, सूस शाखेने रोवला मानाचा तुरा