


थेट दुबईतून संजय दुधाणे…-

भारतात पाकिस्तान लढतींवर बहिष्कार सुरू असताना दुबई नगरी हायहोल्टेज लढतीसाठी सज्ज झाली आहे. 40 अंश सेल्सियस तापमानात सुरू होणाऱ्या महामुकाबल्यासाठी क्रिकेट शौकिनांना उत्साह थंड आहे.
भेगाळलेल्या खेळपट्टीवर यूएईला हरवून भारताने विजयाची गुढी उभारली होती. पाकिस्तान विरूध्द 3 पैकी पाटा खेळपट्टीवर थरार रंगणार आहे. ना भेगा, ना गवत असलेले ही फलंदाजीला साथ देणारी खेळपट्टी सज्ज झाली आहे. धावांचा पाऊसांवर पर्वणी आशिया करंडक स्पर्धेत प्रथमच रविवारी अनुभवता येणार आहे. नाणेफेकी सारं काही अवलंबून असेल. भारताने प्रथम फलदांजी घेतली तर २०० पेक्षा अधिक धावांचा पैसा वसूल करणारा खेळाचा आनंद क्रिकेटशौकिन लुटतील. ४० अंश तापमान असले तरी भारतीय संघ वातावरणाशी एकरूप झाला आहे. ४ फलदांज, ३ गोलंदाज व ३ अष्टपैलू खेळाडू ही रणनीतीने सुपर फोरचा पल्ला सर्वप्रथम गाठण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.














