(महावार्ता विशेष ) भोर विधानसभा मतदारसंघात मुळशीचा समावेश होऊन 15 वर्ष ओलांडली तरी आमदारकीचा चेहरा काही बदलला नाही. हे परिवर्तन घडविण्यासाठी गत निवडणुकीपर्यंत मूळची राष्ट्रवादी झटत होती. यंदा मुळशीतून तीन पक्षाचे 4 जण घाम गाळत आहे. 4 पैकी 2 इच्छुक सोमवारपासून थंडावले आहेत. नाॅट रिचेबलही झाले आहेत. यामुळे भोर विधानसभेची निवडणूक निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. सरळ लढत का बंडखोरासह तिरंगी लढतीत 203 भोर-मुळशी-वेल्हात रंगण्याची शक्यता वाढली आहे…
मुळशीतून उमेदवार दिला तर परिवर्तनाची लाट उसळू शकते. यामुळेच काही जण 2 वर्षांपासून, काही जण 6 महिन्यातून मुळशीत अचानक सक्रीय झाले. गेले महिनाभर तिकिटासाठी इच्छुकांनी वरिष्ठांचे उंबरठे झिजवत आहे. मुंबईत मुक्काम ठोकून आहे. निवडणुकीचा बिगुल वाजला तरी तिकिट काही हाती अजून आले नाही. 4 पैकी दोघांनी आपल्या तलवारी म्यान केल्याचे चित्र आहे. भावी आमदार असलेले त्यांचे बॅनरचे काय करायचा हा प्रश्न बिचार्या कार्यकर्त्यांपुढे पडला आहे…