


ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ, महा संगणकाचे जनक, नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय भटकर यांनी पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल बावधन येथे भेट दिली. यावेळी त्यांनी मातृभाषेतून संवाद साधण्यावर भर दिला तसेच विद्यार्थ्यांनी स्वावलंबी होऊन आत्मनिर्भर बनावे असा मोलाचा उपदेश विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पेरीविंकलचे विद्यार्थी उद्याचे शास्त्रज्ञ झालेले बघायला आवडतील असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. विद्यार्थ्यांनी आपली स्वतःची प्रयोगशाळा तयार करून चिकित्सक बुद्धीने व आपल्या अथक परिश्रमाने आपले भविष्य घडवावे असा मौलिक संदेश दिला.














