पेरिविंकल शाळेत डॉक्टर्स डे साजरा, आरोग्याचा झाला जागर

महावार्ता न्यूज:  चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड जुनियर कॉलेजच्या सुस, पौड, पिरंगुट व बावधन या सर्व शाखांमध्ये  जागतिक डॉक्टर्स डे व C.A.डे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
डॉक्टर्स डे व C.A डे चे औचित्य साधून मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले होते.
या दोन्ही दिवसाचे महत्व लक्षात घेऊन शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्री डेंटल चेक अप चे व इयत्ता 8वी ते 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी बँकिंग अवेयरनेस या विषयावर युनियन बँक चे मॅनेजर यांचे मार्गदर्शनचे आयोजन, सर्व शिक्षकांसंसाठी मोफत हेल्थ चेकअप चे आयोजन करण्यात आले होते.

डॉक्टर्स डे चे औचित्य साधून सर्वप्रथम उपस्थित डॉक्टर, C. A व मान्यवारांचा शाल नारळ व पुष्पगुछ देऊन सत्कार करून आजच्या या दिवशी या सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली .

विद्यार्थ्यांचे डेंटल चेक अप करण्यासाठी डेंटिस्ट डॉ. शालिनी अग्निहोत्री, डॉ. मोहिनी व डेंटिस्ट डॉ शिवप्रिया गुंडाले यांना आमंत्रित करण्यात आले होते. या सर्वांनी विद्यार्थ्यांना दातांची काळजी व निगा कशी घ्यायची याचे काही टेक्निक्स सांगून सर्व विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले.
डॉक्टर्स डे चे औचित्य साधून आज पेरिविंकल शाळेच्या सुस शाखेमध्ये सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी फ्री हेल्थ चेक अप कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते. या हेल्थ चेक अप प्रोग्राम मध्ये उंची, वजन, बॉडी फॅट पर्सेंटेज, बॉडी मास इंडेक्स (BMI) डेली कॅलरी इन्टेक, मेटॅबॉलिक एज, व्हिसरल फॅट, ब्लड प्रेशर, ब्लड शुगर रँडम, SPO-2, ऑक्सिजन लेव्हल आदी सर्व चाचण्यांचा समावेश होता. यासाठी जनरल फिजीशियन डॉ. चेतन मानकर,सर्जेराव ढोबळे, कॅन्सलटन्ट विशाल बिराजदार यांनी श्री देशमुख यांच्या मदतीने या चेकअप चे आयोजन करण्यात आले होते. अचानक उद्भवणाऱ्या प्रसंगात कोणकोणते प्राथमिक उपचार केले पाहिजेत याविषयी सर्वांना डॉक्टर्स तर्फे माहिती देण्यात आली .

See also  गणेशोत्सवात आवाज कोणाचा ? मुळशीकरांचाच…यंदाही मुळशीतील ढोल ताशा पथकांना पुण्यातील गणेश मंडळांकडून मोठी मागणी,

आजच्या बँक जागृतता दिवसाचे औचित्य साधून युनियन बँकेतील मॅनेजर आरती मॅडम यांनी बँक कशी चालते व बँकेची गरज का याबद्दल माहिती दिली. बँकेचे महत्व , बँकेत चालणाऱ्या व्यवहारा विषयी माहिती मुलांना सांगून बँकेतील व्यवहार व बचतीचे महत्व सांगितले.
शाळेत शैक्षणिक वर्ष सुरु होताच डेंटल चेकअप व सर्व शिक्षकांसाठी संपूर्ण हेल्थ चेकअप आयोजित केल्याने सर्व शिक्षकांनी संस्थेचे संस्थापक श्री राजेंद्र बांदल सर व मुख्याध्यपकांचे आभार मानले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल संचालिका सौ रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या नियोजनाने व मार्गदर्शनाने करण्यात आले होते. पर्यवेक्षक सचिन खोडके व नेहा माळवदे तसेच शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्या मदतीने आजचा डॉक्टर्स डे चा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने साजरा झाला.