मुळशीत वीज चोरीचा दोघांवर गुन्हा दाखल, वीजमीटर रिडींग घेणाराचा ठरला आरोपी

महावार्ता न्यूज: कुंपणच शेत खाते अशी वेळ मुळशीतील वीज मंडळावर आली होती. तब्बल वर्षभरानंतर वीजमीटर रिडींग घेणारा व वीज ग्राहक यांच्यावर 1 लाख 65 हजार वीज चोरीचा गुन्हा पौड पोलीसांनी दाखल केला आहे.

वीज कायदा 2003 कलम 138 नुसार सहा. वीज अभियंता ज्ञानेश्वर धंपलवार,वय 38 यांच्या फिर्यादीवरून आरोपी – 1) शैलेश शिवाजी तापकिर 2) भाऊ यादव रा.नांदे ता.मुळशी जि.पुणे यांच्यावर वीज चोराचा गुन्हा दाखल झाला आहे.
मुळशीतील नांदे गावातील मेसर्स अलमदाद कॉम्प्युटर्स यांचेमार्फत वीजमीटर रिडींग घेणारे शैलेश शिवाजी तापकिर यांनी मार्च 2022 ते सप्टेंबर 2023 कालावधत वीजग्राहक भाऊ यादव रा.नांदे ता.मुळशी जि.पुणे( ग्राहक क्र.183161640392) यांचे वीजमीटरचे प्रतिमाह येणारे रिडीगचे फोटो हे वाचता येवु नये म्हणुन ते अस्पष्ट स्वरूपात घेवुन मुळ मीटरवाचन न घेता सरासरी पध्दतीने रिडीग पाठवुन देत होता. वीजग्राहकास वीजमीटरचे बील कमी करतो,10 ते 15 हजार वाचवतो म्हणुन पैशाची मागणी करून वीजमीटर दिला.त्यामुळे वीजकंपनीचे सुमारे 1,65,000/- रू.चे नुकसान झाल्याने तक्रारी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पौड यांचे कोर्टात रवाना केला असून उद्याप कोणाला अटक करण्यात आली नाही.
See also  विजयासह भारतीय संघ आशिया कपच्या अंतिम फेरीत दाखल, थरारक सामन्यात श्रीलंकेवर मात