मुळशीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी,  115 वाहनांचे तपासणी, एक लाखांची रोकड जप्त

महावार्ता न्यूज: मुळशीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पौड पोलीस स्टेशन हद्दीत नाकाबंदी सुरू झाली आहे. 115 वाहनांचे तपासणी करीत 1 लाख रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
माताळवाडी फाटा भुगाव, घोटावडे फाटा, पिरंगुट, हनुमान चौक घोटावडे येथे नाकाबंदी लावण्यात आली होती. सर्व पॉईंटवर १ अधिकारी ३ पोलीस अंमलदार व आयडी A/40 अंडर ॲडव्हॉक 493 BN BSF कपनीचे १२ जवान असे एकुण ३ अधिकारी, ९ अंमलदार, ३६ BSF चे जवान अशी सशस्त्र नाकाबंदी लावण्यात आली होती. नाकाबंदी दरम्यान २३ दुचाकी, ७ तीनचाकी तसेच ८५ चारचाकी वाहने चेक करण्यात आली आहेत.
माताळवाडीफाटा भुगाव येथील चेकिंग दरम्यान दुचाकी क्र MH 12/ ME /9571 वरील चालक ओंकार दत्तात्रय कोतवाल वय २३ रा गुजरात कॉलनी कोथरुड पुणे याचेकडे १ लाख रुपये रोख रक्कम मिळुन आलेने त्यास भरारी पथकाचे ताब्यात देण्यात आलेले असून ते पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांच्या मार्गदर्शनव्दारे पौड पोलीस करीत आहे.
See also  पिरंगुटमधून 3 स्क्रप चोर अटक, भूकूममधील घरफोडीच्या तपासात टाळाटाळ