मुळशीत पोलिसांचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र पथसंचलन

महावार्ता न्यूज:  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पौड पोलिसांच्यावतीने मुळशी तालुक्यात करून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. पिरंगुट, लवळे, नांदे, चांदे, मुलखेड, हनुमान चौक, घोटावडे, चाले करमोळी तसेच पौड गाव आदी परिसरात हे संचलन घेण्यात आले. कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी, गुन्हेगारांवर वचक बसावा, भयमुक्त वातावरणात निवडणूका पार पाडाव्यात तसेच सर्वत्र शांतता निर्माण व्हावी या मुख्य हेतूने हे संचलन घेऊन शक्ती प्रदर्शन करण्यात आले. या संचलनात पाच अधिकारी पंचवीस अंमलदार तसेच बीएसएफचे तीस जवान सहभागी झाले होते.

पौड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक बालाजी कांबळे, संदिप चव्हाण, उपनिरीक्षक योगेश जाधव, कामथे तसेच अन्य अधिकारी व जवानांनी या संचलनात सहभाग घेतला .
See also    ब्रह्माकुमारीजकडून महाशिवरात्री महोत्सव पिरंगुटमध्ये उत्साहात साजरा