ब्रम्हाकुमारीजच्या स्पोर्ट्स विंगकडून ऑलिम्पिक पदकाचे पूजन, खेळाडूंना मार्गदर्शन

ऑलिम्पिक दिनानिमित्त बाणेरमध्ये अत्साहात साजरा

महावार्ता न्यूज: पुण्यातील ब्रम्हाकुमारीजच्या स्पोर्ट्स विंगच्या वतीने ऑलिम्पिक पदक पूजन व परिसंवादव्दारे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
बाणेर ब्रम्हाकुमारीज सेवा केंद्रात 1936 बर्लिन ऑलिम्पिकमध्ये पुण्याचे बाबू निमल यांनी जिंकलेल्या ऑलिम्पिक पदक पूजन करून ऑलिम्पिक दिन समारंभाची सुरूवात झाली. याप्रसंगी भारताचे पहिले पॅरा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर, ऑलिम्पिकपटू बालकृष्ण अकोटकर यांनी आपली ऑलिम्पिक यशोगाथा सांगितली. खेळाडूंसाठी मनाच्या शक्तीसाठी राजयोग ध्यान व सकारात्मक विचार या विषयावर बीके रितू ठक्कर, माऊटआबू येथील स्पोर्ट्स विंगचे बीके आदिती, बीके जगबीर,बीके जयश्री यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. यावेळी उपसंचालक सुहास पाटील, भाग्यश्री बिले, क्रीडा संघटक अजीत निमल, दत्तात्रय कळमकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला क्रीडालेखक संजय दुधाणे यांनी ऑलिम्पिक दिनाचे महत्त्व विशद केले.

मनाची शक्तीव्दारे खेळाडूंना यशाकडे मार्गस्थ कसे व्हावे याचे राजयोग ध्यानाव्दारे मार्गदर्शन करीत बीके आदिती म्हणाले की, सकारात्मक जीवनशैली खेळाडूना यशाचा राजमार्ग गवसेल. ध्यानाच्या मनाच्या शक्तीव्दारे आपले खेळाडू राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय स्पर्धेत चमकतील.
पुण्यातील 210 राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पदकविजेत्यांसह शिवछत्रपती क्रीडासंकुलातील क्रीडा प्रबोधिनीचे खेळाडू सहभागी घेतला होता. कार्यक्रमात जिम्नॉस्टिक्सची प्रात्यक्षिके उपस्थितांची मने जिंकली. राष्ट्रीय पदक विेजेते क्रीडापटू काजल माने, अक्षय जाधव, क्रीडा मार्गदर्शक संजोग ढोले, धीरज मिश्रा यांनी मनोगत व्यक्त केले.

ऑलिम्पिक दिननिमित्त पुण्यात खेळाडूंसाठी प्रथमच निशुल्क ध्यान व मोटिव्हिशनल कॉन्सलिंग केंद्राचे उद्घाटन ऑलिम्पिकपटू बालकृष्ण अकोटकर यांच्या हस्ते करण्यात आले. ुण्यातील खेळाडूंना रोज संध्याकाळी 6 ते 8 यावेळात या केंद्रात मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. पाहुण्यांचे स्वागत ब्रम्हाकुमारीज बाणेर केंद्राच्या प्रमुख बीके त्रिवेणी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक बीके आशा तर सूत्रसंचालन बीके शुभांगी यांनी केले.

See also  मुळशीत काँग्रेस-भाजपाचे शक्तिप्रदर्शन, राष्ट्रवादीचे गाव बैठकांतून समाजकारण, सुनील चांदेरेंच्या गाव बैठकांना मोठी गर्दी