ब्रम्हाकुमारीजच्या स्पोर्ट्स विंगकडून पुण्यात ऑलिम्पिक दिनानिमित्त परिसंवाद, पदक पूजन

पुणे ः ब्रम्हाकुमारीजच्या स्पोर्ट्स विंगचे उद्घाटन व आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनानिमित्त पुण्यात बाणेर येथे रविवारी 23 जून रोजी खेळाडूंसाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनानिमित्त बाणेर येथील समारंभात भारताचे पहिले पॅरा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीधर पेटकर, बीके रितू ठक्कर, बीके दत्ता यांचे विचार ऐकण्याची संधी खेळाडूंना लाभणार आहे. बाणेर येथील ब्रम्हाकुमारीज सेवा केंद्रात सकाळी 9 ते 12 कालावधीत खेळाडूंसाठी मनाच्या शक्तीसाठी राजयोग ध्यान व सकारात्मक विचार या विषयावर परिसंवाद होईल.


आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन समारंभात जेष्ठ ऑलिम्पिकपटू बालकृष्ण अकोटकर, ऑलिम्पिकपटू अजित लाक्रा , शासनाच्या क्रीडा विभागाचे उपसंचालक संजय सबनीस, सुहास पाटील, स्पोर्ट्स विंगचे बीके जगबीर, बीके आदिती, बीके जयश्री, अजित बाबू निमल आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहे. या कार्यक्रमासाठी पुण्यातील 250 पेक्षा अधिक खेळाडूंना आपला सहभाग निश्चित केला आहे. यामध्ये राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पदकविजेत्यांसह शिवछत्रपती क्रीडासंकुलातील क्रीडा प्रबोधिनीचे खेळाडू सहभागी होणार आहेत.
पुण्यात खेळाडूंसाठी प्रथमच निशुल्क ध्यान व मोटिव्हिशनल कॉन्सलिंग केंद्राचे उद्घाटन ऑलिम्पिक दिननिमित्त होत आहे. याचे उदघाटन ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीधर पेटकर, शासनाच्या क्रीडा विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे यांच्या हस्ते होईल.


समारंभात ऑलिम्पिकपटू व राष्ट्रीय क्रीडापटूंचा सत्कार,  योगा व जिम्नॉस्टिक्सची प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार असून 1936 बर्लिन ऑलिम्पिकमध्ये पुण्याचे बाबू निमल यांनी जिंकलेल्या ऑलिम्पिक पदक पूजन सुरूवातीला केले जाणार असल्याची माहिती ब्रम्हाकुमारीज बाणेर सेवा केंद्राच्या प्रमुख त्रिवेणी दीदीजी यांनी दिली आहे.
परिसंवाद निशुल्क नोंदणीसाठी खेळाडू, प्रशिक्षकांनी 75884 75889 या मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

See also  राष्ट्रीय स्पर्धेत आयुषा इंगवलेला कांस्यपदक, मुळशीतील सुवर्णकन्येची सलग सहाव्यांदा पदकाची विक्रमी कामगिरी