


पुणे : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त राज्य क्रीडा दिन महाराष्ट्र ॲालिम्पिक संघटनेच्या वतीने पुण्यात उत्साहात साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सभागृहात
सर्वप्रथम खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तदनंतर खाशाबा जाधव यांच्या इतिहासाचे स्मरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र ॲालिम्पिक असोसिएशनचे महासचिव संजय शेटे, अमित गायकवाड, हॅण्डबॅाल असोसिएशन महाराष्ट्राचे सचिव राजाराम राऊत, महाराष्ट्र शासनाचे क्रीडा मार्गदर्शक शिवाजी कोळी, महाराष्ट्र टेनीक्वाईट असोसिएशनचे सचिव अनिल वर्पे तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी महासचिव संजय शेटे म्हणाले महाराष्ट्र ॲालिम्पिक असोसिएशनच्या सलंग्न सर्व क्रीडा संघटनांनी महाराष्ट्र भर विविध कार्यक्रमातून खाशाबा जाधव यांना मानवंदना दिली. प्रतिकूल परिस्थिती मध्ये खाशाबांनी मिळवलेले ॲालिम्पिक पदक हे कायमच प्रेरणा देणारे आहे.














