अमराळे ज्वेलर्सवतीने 26 जानेवारीला महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, मराठमोळी साजात नटून येणारी महिलेस आकर्षक भेटवस्तू

पिरंगुट : लवळे फाटा येथील अमराळे ज्वेलर्स यांच्या वतीने मकरसंक्रातीनिमित्त महिलांसाठी दरवर्षी प्रमाणे हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठमोळी साजात नटून येणारी महिलेस आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.


अमराळे ज्वेलर्स आयोजित हळदी कुंकू कार्यक्रम रविवार ( दि.२६ जानेवारी ) रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला असून यासाठी मुळशी तालुक्यात सर्व महिलानी भाग घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

मुळशी तालुक्यातील बाळासाहेब अमराळे यांनी पुण्यानंतर अमराळे ज्वेलर्सची मुळशीत शाखा सुरू केली. विश्वसनीय ज्वेलर्स म्हणून मुळशीत अमराळे ज्वेलर्स नावाजले असल्याने प्रजासत्ताक दिना दिवशी होणाऱ्या हळदी कुंकू समारंभ मुळशीतील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग निश्चित केला आहे.

See also  पिरंगुटमधील तुळजाभवानी मंदिरात भक्तीचा जागर, उद्या दुर्गामाता दौड, वाचा श्री तुळजाभवानी देवस्थानचा इतिहास फक्त महावार्तावर